25
दहा कुमारींचा दुष्टान्त
1
येशूने त्याचे बोलणे पुढे सुरूच ठेवले, “मी स्वर्गातून एक राजा म्हणून परत येईन, तेव्हा ज्या दहा कुमारी एका लग्नाच्या मेजवानीसाठी गेल्या असता त्यांच्यासोबत जे घडले तशा प्रकारे होईल. त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिवे घ्यायचे होते आणि येणाऱ्या वराची वाट पाहायची होती.
2
आता त्या दहापैकी पाच हुशार होत्या आणि पाच मुली मूर्ख होत्या.
3
त्या पाच मूर्ख मुलींनी आपल्यासोबत दिवे तर घेतले, परंतु त्या दिव्यामध्ये घालण्यासाठी जास्तीचे जैतूनाचे तेल त्यांनी सोबत घेतले नव्हते.
4
परंतु हुशार मुलींनी आपल्या सोबत नुसते दिवेच नाही घेतले तर त्या दिव्यात घालण्यासाठी तेलही एका भांड्यात ठेवले होते.
5
वराला येण्यासाठी खूप विलंब होत होता, आणि तो पर्यंत रात्रही झाली. त्यामुळे सर्व मुलींना झोप लागली आणि त्या झोपी गेल्या.
6
मध्यरात्री कोणीतरी त्यांना ओरडून उठवले आणि म्हटले, ‘तो आला आहे! वर येथे पोहचला आहे! तुम्ही बाहेर जा आणि त्याची भेट घ्या!
7
म्हणून त्या सर्व मुली झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे पुन्हा पेटवले.
8
मूर्ख मुली हुशार मुलींना म्हणाल्या, ‘आम्हाला तुमच्याकडील थोडे तेल द्या, कारण आमचे दिवे विजण्यास आले आहेत!’
9
त्या हुशार मुलींनी त्यांना प्रत्युत्तर दिले, ‘नाही, कारण आम्ही जर तुम्हाला ते दिले तर आमच्या दिव्यांसाठी व तुमच्या दिव्यांसाठी ते पुरेसे असणार नाही. म्हणून तुम्ही तेल विकणाऱ्यांकडे जा व स्वतःसाठी काही विकत घ्या!’
10
परंतु त्या मूर्ख मुली तेल विकत घेण्यासाठी निघाल्या होत्या, त्या वेळेस वर आला. तेव्हा ज्या हुशार मुली तयार होत्या त्या त्याच्या सोबत विवाहाच्या सभागृहात गेल्या जेथे वधू वाट पाहात होती. त्यानंतर त्या सभागृहाचे दार बंद करण्यात आले.
11
काही वेळाने, त्या बाकीच्या मूर्ख मुलीही विवाहाच्या सभास्थानी आल्या, आणि त्यांनी वराला हाक मारून म्हटले, ‘महाशय, आम्हासाठी दार उघडा!’
12
परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, ‘खरे पाहिले असता मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणून मी तुमच्यासाठी दार उघडणार नाही!’
13
मग येशूने आपले बोलणे पुढे सुरू ठेवले आणि तो म्हणाला, “तुम्हा सोबतही असेच घडू नये म्हणून, मी परत येण्याची वाट पाहत राहा, कारण मी केव्हा परत येईन हे तुम्हाला ठाऊक नाही.”
रुपयांचा दुष्टान्त
14
“मी स्वर्गातून राजा म्हणून परत येईन, तेव्हा एखादा मनुष्य जो लांबच्या प्रवासासाठी निघतो त्याच्यासारख असेन. त्याने त्याच्या सेवकांना एकत्र बोलावले आणि आपल्या मालमत्तेतून त्यांच्यातील प्रत्येकाला काही पैसा दिला जो त्यांनी गुंतवणूक करायचा होता आणि त्याच्यासाठी त्यावर अधिक नफा मिळवायचा होता.
15
त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्याने त्यांना पैसा वाटून दिला. उदाहरणार्थ, त्याने एका सेवकाला सोन्याने भरलेल्या पाच थैल्या दिल्या आहे, दुसर्या एका सेवकाला त्याने सोन्याच्या दोन थैल्या दिल्या, आणि त्याच्या दुसऱ्या एका सेवकाला त्याने केवळ एकच सोन्याची थैली दिली, मग तो लांबच्या प्रवासासाठी निघून गेला.
16
ज्या सेवकाला सोन्याच्या पाच थैल्या मिळाल्या होत्या त्या सेवकाने लागलेच निघून जाऊन त्याच्याद्वारे अधिक पाच थैल्या कमावल्या.
17
त्याच प्रकारे, ज्या सेवकाला सोन्याच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या त्यानेही त्यांच्यावर व्यापार करून आणखी दोन थैल्या कमावल्या.
18
परंतु ज्या सेवकाला सोन्याची एकच थैली मिळाली होती तो बाहेर गेला, आणि त्याने जमिनीमध्ये एक खड्डा खणला, आणि ती थैली त्याने सुरक्षित राहावी म्हणून तेथे पुरून ठेवली.
19
बऱ्याच काळा नंतर त्यां सेवकांचा धनी परत आला. त्याने जो पैसा सेवकांना दिला होता त्यांचे त्या प्रत्येकाने काय केले हे समजून घेण्यासाठी त्याने त्यांना एकत्र बोलावले.
20
ज्या सेवकाला त्याने पाच सोन्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याच्याकडे दहा थैल्या आणून दिल्या. तो म्हणाला, ‘स्वामी, तुम्ही माझ्याकडे पाच सोन्याच्या थैल्या सांभाळण्यासाठी दिल्या होत्या. पाहा, मी आणखी पाच कमावल्या आहेत!’
21
त्याच्या स्वामीने त्याला उत्तर दिले, ‘तू खूप चांगला सेवक आहेस! तू माझ्यासोबत विश्वासयोग्य राहिला आहेस. मी दिलेली ही लहान रक्कम तू खूप चांगल्या रीतीने हाताळली आहेस म्हणून मी तुला अधिक मोठ्या जबाबदारीवर नेमेन. ये आणि माझ्यासोबत आनंद कर!’
22
ज्या सेवकाला त्याने दोन सोन्याच्या थैल्या दिल्या होत्या, तो आला आणि त्याने म्हंटले स्वामी तुम्ही माझ्याकडे दोन सोन्याच्या थैल्या सांभाळण्यासाठी दिल्या होत्या. पाहा, मी आणखी दोन कमावल्या आहेत!’
23
त्याच्या स्वामीने त्याला उत्तर दिले, ‘तू खूप चांगला सेवक आहेस! तू माझ्यासोबत खूप विश्वास योग्यतेने वागला आहेस. ही लहानशी रक्कम तू खूप चांगल्या रीतीने हाताळली आहे म्हणून मी तुला मोठ्या जबाबदारीवर नेमेल. ये आणि माझ्यासोबत आनंद कर!’
24
त्यानंतर ज्या सेवकाला सोन्याची केवळ एकच थैली मिळाली होती तो तेथे आला. तो म्हणाला, ‘स्वामी, मला तुमची भीती वाटत होती. एखाद्या शेतकऱ्याने एखादे शेत पेरले नसताही त्या शेतातून कापणीची अपेक्षा करावी तशा प्रकारे तुम्ही देखील कोणतीही गुंतवणूक न करता बर्याचशा पैशांची अपेक्षा करणारे व्यक्ती आहात हे मला ठाऊक आहे.
25
तुम्ही मला गुंतवणूक करण्यासाठी जी रक्कम दिली होती ती गुंतवणूक केल्यानंतर जर मी ते पैसे गमावले तर तुम्ही काय कराल ह्याविषयी मला भीती वाटत होती म्हणून मी ते पैसे जमिनीत लपवून ठेवले. हे पाहा हे ते आहेत; कृपया हे परत घ्या!’
26
त्याच्या स्वामीने प्रत्युत्तर दिले, ‘अरे दुष्ट, आळशी दासा! मी गुंतवणूक केली नसताही पैशांची अपेक्षा करतो हे तुला ठाऊक नव्हते काय?
27
तर मग, तू माझे पैसे बँकेमध्ये जमा करायचे असते, म्हणजे जेव्हा मी परत आलो तेव्हा ते मला त्यावरील व्याजासहित परत मिळाले असते!’
28
मग त्या स्वामीने त्याच्या इतर सेवकांना म्हटले, “त्याच्या जवळून ती सोन्याची थैली घ्या आणि ज्या सेवकाजवळ दहा थैल्या आहेत त्याला ती द्या!
29
ज्या लोकांना प्राप्त झालेल्या गोष्टींचा उत्तम रीतीने उपयोग करता येतो, देव त्यांना अधिक देतो, आणि अशाने त्यांच्याकडे पुष्कळ होते. परंतु प्राप्त झालेल्या गोष्टींना जे लोक योग्य रीतीने उपयोगात आणत नाहीत त्यांच्याकडे जे असते तेही त्यांच्याकडून काढून घेतले जाते.
30
एवढेच नव्हे तर, या निरुपयोगी दासाला बाहेर अंधारात टाकून द्या आणि तेथे तो त्यांच्यासारख्याच बरोबर विलाप करेल आणि वेदनेमध्ये आपले दात खाईल.’”
न्यायाचा दिवस
31
“मी, मनुष्याचा पुत्र परत येईन, तेव्हा मी माझ्या तेजस्वी गौरवाने आणि माझ्या सर्व देवदूतांच्यासोबत परत येईन. त्यानंतर सर्वांचा न्याय करण्यासाठी मी माझ्या सिंहासनावर राजा म्हणून विराजमान होईन.
32
सर्व प्रकारच्या गटांतील सर्व लोकांना माझ्यासमोर एकत्रित केले जाईल. जसा एक मेंढपाळ त्याच्या कळपातील मेंढरांपासून बकऱ्या वेगळ्या करतो तसेच मी देखील लोकांना वेगवेगळे करीन.
33
मी नीतिमान लोकांना माझ्या उजव्या हाताला आणि अनीतिमान लोकांना माझ्या डाव्या बाजूला जसे मेंढरे आणि बकरे वेगळे करतात तसे करीन.
34
जे माझ्या उजव्या बाजूस आहेत त्यांना मी असे म्हणेन, ‘तुम्ही लोक माझ्या पित्याद्वारे आशीर्वादित आहात! या आणि ज्या सर्व उत्तम गोष्टी तो तुम्हाला देत आहे त्या स्वीकारा कारण आतापासून सदासर्वकाळ तो तुम्हावर संपूर्णपणे राज्य करणार आहे या जगाच्या निर्मितीपासून त्याने त्या गोष्टी तुम्हासाठी उत्पन्न केल्या आहेत.
35
ह्या गोष्टी तुमच्या आहेत, कारण जेव्हा मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काहीतरी खावयास दिले. मी जेव्हा तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. जेव्हा मी तुमच्या शहरांमध्ये परका होतो, तेव्हा तुम्ही मला तुमच्या घरांमध्ये राहण्यासाठी आमंत्रित केले.
36
मला जेव्हा वस्त्रांची आवश्यकता होती, तेव्हा तुम्ही मला ते दिले. जेव्हा मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. जेव्हा मी तुरूंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी भेट घेण्यासाठी आला.
37
मग देवाने ज्यांना चांगले लोक म्हणून निवडले आहे ते लोक त्याला म्हणतील, ‘हे प्रभू, तू केव्हा भुकेला होता आणि आम्ही तुला काहीतरी खावयास दिले? आणि तू कधी तान्हेला होता आणि आम्ही तुला काहीतरी प्यावयास दिले?
38
जेव्हा तुम्ही आमच्या शहरांमध्ये अनोळखी व्यक्ती म्हणून आसताना आम्ही तुला कधी आमच्या घरात आमंत्रित केले? तुला केव्हा वस्त्रांची गरज होती आणि आम्ही तुला कधी कपडे दिले?
39
तू कधी आजारी होतास आणि कधी तुला तुरूंगात तुला टाकले व आम्ही येऊन तुझी भेट घेतली? तू सांगितलेल्या गोष्टीपैंकी कोणतीही गोष्ट केल्याची आम्हाला आठवण नाही.
40
तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, “तुम्ही तुमच्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांसाठी ह्यापैकी कोणतीही गोष्ट केली असली आणि अतिशय कमी महत्वाचा लोकांसाठी जर ते केले असेल तर तुम्ही नक्कीच ते माझ्यासाठी केले आहे हे सत्य आहे.’
41
परंतु जे माझ्या डावीकडे उभे असतील त्यांना मी असे म्हणणार, ‘देवाने तुम्हा लोकांना शापित केलेले आहे, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा! देवाने सैतानासाठी आणि त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या सर्वकाळाच्या अग्नीमध्ये तुम्ही जा!
42
तुम्ही तिथे जावे हे तुम्हा साठी योग्य आहे, कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खाण्यासाठी काहीही दिले नाही. मी जेव्हा तहानेला होतो तेव्हा तुम्ही माझी तहान भागवण्यासाठी मला काही प्यायला दिले नाही.
43
तुमच्या शहरांमध्ये मी जेव्हा परका होतो तेव्हा तुम्ही मला तुमच्या घरामध्ये आमंत्रित केले नाही. मला गरज होती तेव्हा तुम्ही मला कपडे दिले नाही. मी आजारी होतो किंवा जेव्हा मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
44
तेव्हा ते उत्तर देतील, ‘हे प्रभू, तू केव्हा भुकेला किंवा तहानेला किंवा अनोळखी परका किंवा वस्त्रांच्या गरजेत किंवा आजारी किंवा तुरूंगात होतास आणि आम्ही तुला मदत केली नाही?’
45
मी त्यांना उत्तर देईन, ‘जेव्हा तुम्ही माझ्या लोकांपैकी अगदी लहानातील लहानापैकी कोणासाठीही ते केले नव्हते, तेव्हा वास्तविक पाहता तुम्ही ते माझ्यासाठी केले नव्हते.’
46
त्यानंतर माझ्या डावीकडे उभे असणार्या त्या लोकांना देवाने त्यांना शिक्षा देण्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे सदासर्वकाळासाठी जावे लागेल, देवाच्या दृष्टीने जे लोक चांगले आहेत ते देवासोबत सदासर्वकाळ राहण्यासाठी जातील.