1
येशू ख्रिस्ताची वंशावळी
1
अब्राहाम आणि दावीद राजाचा वंशज, येशू ख्रिस्ताच्या वंशावळीचा हा वृत्तांत आहे.
2
अब्राहाम हा इसहाकाचा पिता होता. इसहाक हा याकोबाचा पिता होता. याकोब हा यहूदा आणि त्याचे भाऊ ह्यांचा पिता होता.
3
यहूदा हा पेरेस आणि जेरह ह्यांचा पिता होता, तामार ही त्यांची आई होती. पेरेस हा हेस्त्रोनाचा पिता होता. हेस्त्रोन हा अरामाचा पिता होता.
4
अराम हा अम्मीनादाबाचा पिता होता. अम्मीनादाब हा नहशोनाचा पुत्र होता. नहशोन हा सल्मोनाचा पिता होता.
5
सल्मोन व त्याची पत्नी रहाब हे इस्राएली नव्हते, ते दोघे बवाजाचे आई वडील होते. बवाज हा ओबेदाचा पिता होता. ओबेदाची आई रुथ ही देखील इस्राएली स्त्री नव्हती. ओबेद हा इशायाचा पिता होता.
6
इशाय हा दावीद राजाचा पिता होता. दावीद हा शलमोनाचा पिता होता. शलमोनाची आई उरीयाची पत्नी होती.
7
शलमोन हा रहबामाचा पिता होता. रहबाम हा अबीयाचा पिता होता. अबीया हा आसाचा पिता होता.
8
आसा हा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट हा योरामाचा पिता होता. योराम हा उज्जीयाचा पूर्वज होता.
9
उज्जीया हा योथामाचा पिता होता. योथाम हा अहाजाचा पिता होता. अहाज हा हिज्कीयाचा पिता होता.
10
हिज्कीया हा मनश्शेचा पिता होता. मनश्शे हा अम्मोनाचा पिता होता. अम्मोन हा योशीयाचा पिता होता.
11
योशीया हा यखन्या आणि त्याच्या भावांचा आजोबा होता. जेव्हा बाबेलच्या सैन्यांनी इस्राएली लोकांना गुलाम म्हणून बाबेल देशात घेऊन गेले त्या वेळेत ते तेथे होते.
12
बाबेलच्या लोकांनी इस्राएलांना बाबेल देशात घेऊन गेले त्यानंतर, यखन्या हा शल्तीएलाचा पिता झाला. शल्तीएल हा जरूब्बाबेलाचा आजोबा होता.
13
जरूब्बाबेल हा अबीहूदाचा पिता होता. अबीहूद हा एल्याकीमाचा पिता होता.
14
एल्याकीम हा अज्जुराचा पिता होता. अज्जुर हा सादोकाचा पिता होता. सादोक हा याखीमाचा पिता होता.
15
याखीम हा एलीहूदाचा पिता होता. एलीहूद हा एलाजाराचा पिता होता. एलाजार हा मत्तानाचा पिता होता. मत्तान हा याकोबाचा पिता होता.
16
याकोब हा योसेफाचा पिता होता. योसेफ हा मरीयेचा पती होता, मरीया ही येशूची आई होती. तो येशू ज्याला ख्रिस्त म्हणतात.
17
येशूच्या पूर्वजांची यादी या प्रकारे केली आहे: अब्राहामाच्या वेळेपासून तर दावीद राजा जगला तेथपर्यंत चौदा पिढ्या. आणि दाविदाच्या वेळेपासून तर इस्राएल लोक बाबेल देशामध्ये जाण्यापर्यंत दुसऱ्या चौदा पिढ्या, आणि येथून ते ख्रिस्त जन्मला तेथपर्यंत आणखी चौदा पिढ्या.
येशू ख्रिस्ताचा जन्म
18
येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी जे काही घडले त्याचा हा तपशील आहे. त्याची आई, मरीया हिचा विवाह योसेफाशी होण्याचे ठरले होते, परंतु ते दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहण्या पूर्वी, त्यांना असे दिसून आले की तिला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दिवस गेले आहेत.
19
तर आता, योसेफ जो तिचा पती होणार होता, तो देवाच्या आज्ञांचे पालन करणारा मनुष्य होता, म्हणून तिच्याशी विवाह करू नये असे त्याने ठरवले. परंतु इतर लोकांसमोर तिचा अपमान व्हावा अशी त्याची इच्छा नव्हती. म्हणून तिच्याशी विवाह करण्याच्या योजनेपेक्षा तिला शांततेने सोडून द्यावे असा निर्णय घेतला.
20
तो ह्यावर गांभीर्याने विचार करत होता, तेव्हा देवाने पाठवलेल्या एका दूताने त्याच्या स्वप्नात येऊन त्याला आश्चर्यचकित केले. देवदूताने म्हटले, “दाविदाच्या पुत्रा, योसेफा, मरीयेशी विवाह करण्यासाठी कचरू नको. तिच्यामध्ये जो गर्भ राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
21
ती एका पुत्राला जन्म देईल, आणि तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारणारा असल्यामुळे त्याचे नाव तू ‘येशू’ ठेव.’”
22
हे सर्व ह्यासाठी घडले कारण, फार काळापूर्वी देवाने यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे काही लिहिले होते ते सगळे खरे व्हावे. यशयाने लिहिले आहे,
23
“पाहा एक, कुमारी गर्भवती होईल आणि एका पुत्राला जन्म देईल. ते त्याला इम्मानुएल असे म्हणतील,” त्याचा अर्थ ‘आम्हाबरोबर देव.’”
24
मग योसेफ झोपेतून उठल्यावर, देवदूताने त्याला करण्यास सांगितले होते तसेच त्याने केले. त्याने मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.
25
परंतु तिने पुत्राला जन्म देईपर्यंत त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले नाही; त्याने त्याचे नाव येशू ठेवले.