Matthew 1

Matthew 1:1

येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये, कोणत्या दोन पूर्वजांची त्यांच्या महत्वाला दर्शवित प्रथम नोंद केली आहे?

दोन पूर्वजांची पथम नोंद केली आहे आणि ते म्हणजे दावीद आणि अब्राहाम [१:१].

Matthew 1:15

वंशावळीच्या शेवटी कोणाच्या पत्नीचे नांव लिहिले आहे, आणि तिची का नोंद केली आहे?

योसेफाची मरीया, हीची नोंद केली आहे कारण तिच्या द्वारेच येशू जन्माला आला [१:१६].

Matthew 1:18

योसेफाबरोबर राहाण्यांस येण्यागोदर मरीयाचे काय झाले?

योसेफाबरोबर राहाण्यांस येण्यागोदर मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झाली [१:१८].

योसेफ कशा प्रकारचा मनुष्य होता?

योसेफ नीतिमान मनुष्य होता [१:१९].

मरीया गर्भवती आहे असे समजल्यानंतर योसेफाने काय करण्याचा निर्णय घेतलं?

मरीयाबरोबरील त्याच्या मागणीस गुप्तपणे समाप्त करण्याचा त्याने निर्णय घेतला [१:१९].

Matthew 1:20

योसेफाला असे काय झाले होते की त्याने मरीयेबरोबर राहाण्याचा निर्णय घेतला?

देवदूताने योसेफाच्या स्वप्नांत येऊन त्याला मरीयेचा त्याची पत्नी म्हणून स्वीकार करण्यास सांगितले कारण तिच्या गर्भातले बाळ हे पवित्र आत्म्यापासून होते [१:२०]

बाळाचे नांव येशू ठेव असे योसेफाला का सांगितले होते?

योसेफाला ह्यासाठी बाळाचे नाव येशू ठेवण्यांस सांगितले होते कारण की तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणार होता [१:२१].

Matthew 1:22

ह्या घटनेमध्ये जुन्या करारातील पूर्ण झालेली भविष्यवाणीने काय सांगितले होते?

जुन्या करारातील भविष्यवाणीने सांगितले की, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि ते त्याला इम्मानुएल हे नांव देतील, ज्याचा अर्थ "आम्हाबरोबर देव" [१:२३].

Matthew 1:24

मरीया येशूला जन्म देईपर्यंत योसेफाने काय न करण्याची काळजी घेतली होती?

येशूला जन्म देईपर्यंत मरीयेबरोबर न झोपण्याची योसेफाने काळजी घेतली होती [१:२५].