3

1 सार्दीश हुतीले मंडळीने दुतला ल्हेव;ज्यान्हेजवळ देवन सात आत्म आसत आन सात तार आसत तो आसा आखं;तुन्ही कुर्त्य मला माहीत आसत;तू जिंवत आसस, आसा तुन्हेब्द्द्ल आखत, पण तू मरेल आसस. 2 जागा व्ह, आण जे मरांने मार्गला लागीत, त्यासाला सावरी धर;कारण तुन्ही कृत्ये मान्हे देवने द्रुष्टीन पूर्ण अशी मान्हे ज्वानामन ईत नाहा. 3 म्हणी तुन्ह कसा स्वीकार करणास आन ऐकनास यान्ही आठवण कर;ता जपी ठिव आन पश्चाताप कर;कारण तू जागा व्ह्य्नास नाहा तर मय चोरणे सारखा येसुक, मय कोणते वेळेस तुझवर चाली येसुक हाय तुला मुळीच कळणार नाहा. 4 तरी ज्यास आपलं कपड बाटव्या नाहा. आश थोडक नावं सार्दीस हुती तुन्हेजवळ आसत; ते शुभ्र वस्र घाली मान्हे बरोबर फीरयीत, कारण तशी त्यास्नी योग्यता आस. 5 जो विजय मिळव तो आशे रितीन शुभ्र वस्र घालेलं व्हयी;मय 'जीवने पुस्ताक महीन 'त्यान्हा नाव खोडणार नाहा. आन मान्हे आबासने पुढ आन त्यान्हे दुतासने पुढ मय त्यान्हा नाव स्वीकारसुक. 6 आत्मा मंडळ्यास्ला का आख हाय ज्याला कान आस तो ऐको. फीलदेल्फिया हुतीले ख्रिस्ती मंडळीला पत्र 7 फीलदेल्फीया हुतीले मंडळीने दुतला ल्हेव; जो पवित्र आन सत्य आस, ज्यान्हेजवळ 'दावीद्नी किल्ली आस, ज्यान्ह उघडल्यावर कोणी बंद करणार नाहा आन ज्यान बंद केल्यावर कोणी उघडणार नाहा, 'तो आसा आख; 8 तुन्ह कृत्य मला माहीत आसत. ज्वा, महे तुम्ह्नेपूढ दार उघडी ठुयीत., ता कोणी बंद करू शकत नाहा;तुला शक्ती थोडी आस, तरी तुन्ह मान्हा वचान पाळणा आसस, आन मान्हा नाव नाकारणा नाहा. 9 ज्वा, जे सैतान्ने सभान आशी आपल्याला यहुदी आखत पण तस ते नाहात, ते लबाड बोलत;त्यास्नेपैकी बरेचजनास्ला मय तुन्हे ताब्यामन देसुक. ज्वा, ते'यी तुन्हे पायने जवळ तुला नमन करइत'आन महे तुजवर प्रेम करेल आस. हाय त्यासाला कळी यीही. आसा मय करसूक. 10 धीरने बद्दल मान्हा वचान तुन्ह पाळणा आसस. म्हणी पृथ्वीवर रह्णारे लोकास्नी परीक्षा व्ह्वानी जो परीक्षा प्रसंग सगळे जगवरयेणार आस, त्यासपहीन मय तुला राखसुक. 11 मय लवकर येय;तुन्हा मुगुट कोण्ह ल्हेवा नाहा म्हणी जा तुन्हेजवळ आस ता द्रुढ धरी रह. 12 जो विजय मिळव त्याला मय मान्हे देवने मंदीर मधला स्तंभ करसुक;तो तहीन कधीच बाहेर जाणार नाहा;त्याजवर मान्हे देवना नाव, स्वर्गमहीन मान्हे देवपहीन उतरणारी नवी यरुश्लेम, म्हजे मान्हे देवणी 'नगरी, यीना नांव, 'आन मान्हा नवा नाव ल्हेसुक. 13 आत्मा मंडळ्यास्ला का आख हाय ज्याला कान आस तो ऐको. लावदिकीया हुतीले ख्रिस्ती मंडळीला पत्र 14 लावदिकीया हुतीले ख्रिस्ती मंडळीने दुतला ल्हेव. जो आमेन, जो 'विश्वासनीय 'आन खरा 'साक्षी'जो देवने सृष्टीना सत्ताधीस [अधिकारी] तो आसा आख; 15 तुन्ह कृत्ये मला माहीत आसत;तू थंड नाहास आन गरमय पन नाहास.. त थंड किंवा गरम आसतास तर बरा व्हता; 16 पण तू तसा नाहास तर, कोमट आसस; म्हजे गरम नाहास, थंड नाहास, म्हणी मय तुला आपले तोंड महीन वकी टाकणार आस, 17 मय श्रीमंत आस, महे धन मिळवेल आस, 'आन मला काही कमी नाहा आस, आसा तू आखस;पण तू नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळा आन ओंगाळ आसस, हाय तुला कळ नाहा. 18 म्हणी मय तुला सल्ला देय की, श्रीमंत व्ह्नेसाठी तू जाळंमन शुद्ध करेल सोना मसपहीन विकत ल्हे;तुन्ही लज्जास्पद नग्नता दिसवा नाहा म्हणी घालवानी शुभ्र वस्र विकत ल्हे;आन तुला द्रुष्टी यावा म्हणी डोळामन घालवानी अंजन विकत ल्हे. 19 'जितकास्वर मय प्रेम कर तितकास्ना निषेध करी त्यासाला शिक्षा कर. म्हणी आस्था बाळग [प्रयत्न करवानी लाग आन पश्चाताप कर. 20 ज्वा, मय दारपन उभा आस आन दार ठोकत रह्यीत; जर कोणी मान्ही वाणी ऐकी दार उघडयी, तर मय त्यासपन मधी जायसुक आन त्यान्हे बरोबर जेवसुक [खासुक] आन तो मान्हे बरोबर जेवयी. 21 मय जसा विजय मिळवी आपले आबास्ने बरोबर त्यान्हे राजासनवर बसित, तसाच जो विजय मिळव त्याला मय आपले राजासनवरआपले बरोबर बसू देसुक. 22 आत्मा मंडळ्यास्ला का आख हाय ज्याला कान आस तो ऐको.