६

1 मुलांनो, प्रभूमं तुम्हू आपले आईबापासने आज्ञामं राहा, कारण हाय योग्य आसं. 2 - 3 आपला बाप व आपली आई यास्ना मान राखा, हेसाठी की, तुन्हां कल्याण व्हावा व तू पृथ्वीवर दीर्घायू आसवा. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आसं. 4 बापानो, तुम्हू आपले मुलासला चिरडीस आणू नका; तर प्रभूने शिस्तीमं व शिक्षणमं वाढवा. 5 दासानो, आपुन ख्रिस्तानाच आज्ञापालन करत आसत 6 आशे भावनान तुम्हू भीत भीत व कापत कापत सरळ अंतकरणान आपले देहदशामधले धन्याना आज्ञापालन करत जा. 7 ही चाकरी माणसासनी नाहा तर प्रभूनी आसं आसा मानी ती सद्भावन करा; 8 कारण तुम्हाला माहित आसं की, प्रत्येकजण, मग तो दास आसो किवा स्वतंत्र आसो, जा काही चांगला कर, ताच तो प्रभूपहिन भरी पावही. 9 धन्यासहो, तुम्हूपण त्यासाबरोबर तसाच वागा; व धमकावनी सोडी द्या, कारण तुम्हाला हाय माहित आसं की, तुम्ह्ना व त्यासना धनी स्वर्गामं आंसं आन त्यान्हेजवळ पक्षपात नाहा. 10 शेवटी, प्रभूमं व त्यान्हे प्रभावी सामर्थ्यान बलवान व्हत जा. 11 सैतानने डावपेच पुढ तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणी देवनी शस्त्रसामग्री धारण करा. 12 कारण आपला झगडना रक्तमांसनेबरोबर नाहा, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्यांनेबरोबर, सद्ध्याने काळोखमधले जगने आधीपतीनेबरोबर, आकाशमधले दुरात्मासनेबरोबर आसं. 13 हे कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसमं प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणी देवनी शस्त्रसामग्री घ्या. 14 तर मग आपली कंबर सत्यान कसा; नितीमत्वाना उरस्राण धारण करा, 15 शांतीने सुवार्तान लाभलेली सिद्धता पायी चढवा, 16 आन हे सर्वाबरोबरच जिन्हे योगे ते दृष्टान सगळ जळत बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासनी ढाल हाती घ्या व उभं रहा. 17 तरणाना शीरस्त्राण व आत्मानी तरवार म्हणजी देवना वचन, ही घ्या; 18 सर्व प्रकारणी प्रार्थना व विनवनी करा, सर्व प्रसंगी आत्माने प्रेरणान प्रार्थना करा, आन हे कामी पूर्ण तत्परतान व सर्व पवित्रजणासने साठी विनवणी करत जागृत राहा. 19 - 20 मान्हेसाठीही विनवणी करा की, जे सुवार्तानेपायी बेड्या पडलेला मय वकील आसं तिन्हा रहस्य उघडपणे कळवाणीसाठी मय तोंड उघडसु तव्हा मला शब्द सुचवा, हेसाठी की, जसा बोलवानी पाहिजे, तसा मला उघडपणान बोलता यावा. 21 मान्हां कसा काय चालना आसं हाय तुम्हालाही समजावा म्हणी प्रिय बंधू व प्रभूमं विश्वासू सेवक जो तुखीक तो तुम्हाला सर्व काही कळवी; 22 आम्ह्नी खुशाली तुम्हाला कळवा व त्यान्ह तुम्ह्ने अंतःकरणना समाधान करवा हेकरताच मय त्याला तुम्हात्याव पाठवना आसं. 23 देवपिता व प्रभू येशु ख्रिस्त यासापहिन बंधूसला शांती व विश्वासनेबरोबर प्रीती लाभो. 24 आपले प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणार आसत ते सर्वाबरोबर कृपा आसो.