8
कुष्ठरोग्याला बरे करणे
1
येशू डोंगरावरून खाली आला तेव्हा, लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला.
2
येशूने लोक समुदायाला निरोप दिल्यानंतर, त्वचा रोग असलेला एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकले. तो येशूला म्हणाला, “प्रभू, कृपा करून मला बरे करा, कारण जर तुमची इच्छा असेल तर मला बरे करण्यास तुम्ही सक्षम आहात हे मला ठाऊक आहे.”
3
आजारी व्यक्तीला निरोगी लोकांपासून दूर ठेवण्याचा नियम येशूने मोडला; आणि त्याने आपला हात सरळ केला व त्या मनुष्याला स्पर्श केला. तो त्याला म्हणाला, “तुला बरे करावे अशी माझी इच्छा आहे, मी आताच तुला बरे करतो!” लागलीच तो मनुष्य आपल्या आजारातून बरा झाला.
4
मग येशू त्याला म्हणाला, “जवळपास असलेल्या याजकाकडे जाऊन स्वतःस दाखव जेणेकरून त्याने तुझे परिक्षण करावे आणि आता येथून पुढे तू आजारी नाही ह्याची त्याने खात्री करावी. मग त्याने स्थानिक लोकांना सांगितल्या नंतर, त्यांना कळून येईल की तुला आता कुष्ठरोग राहिलेला नाही, मग पुन्हा तू त्यांच्या सोबत राहण्यास सक्षम होशील. मी तुला बरे केले आहे हे याजकाशिवाय कोणालाही सांगणार नाहीस ह्याची खात्री कर. नंतर यरुशलेमेतील मंदिरात जा आणि मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ह्या आजारातून बरे झालेल्या लोकांनी देवाला द्यावयाचे अर्पण याजकाला दे.
शताधिपतीचा चाकर
5
मग येशू कफर्णहूम शहरास आला तेव्हा, एक रोमी शिपाई जो शंभर सैनिकांवर अधिकारी होता त्याच्याकडे आला. त्याने येशूकडे मदतीसाठी विनंती केली.
6
तो त्याला म्हणाला, “प्रभू, माझ्या सेवकाला पक्षघात झाला आहे, आणि तो घरी अंथरुणावर पडलेला आहे, आणि त्याला अतिशय वेदना होत आहेत.”
7
येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्या घरी जाईन आणि त्याला बरे करीन.”
8
परंतु अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभू, जाण्याचा त्रास घेऊ नका. तुम्ही माझ्या घरी यावे आणि माझ्याशी जोडले जावे इतक्या योग्यतेचा मी नाही. त्या ऐवजी, माझा सेवक बरा झाला आहे एवढेच बोला, आणि तो बरा होईल.
9
माझ्या सोबत देखील असेच आहे. मी एक सैनिक आहे; मला माझ्या सेनापतीची आज्ञा पाळावी लागते, आणि ज्यांना मी आज्ञा देतो असे देखील सैनिक माझ्याकडे आहेत. जेव्हा त्यांच्या पैकी एकाला मी ‘जा!’ म्हटले की तो जातो. जेव्हा दुसऱ्याला ‘ये!’ म्हटले की तो येतो. मी जेव्हा माझ्या दासाला म्हणतो, की ‘हे कर!' तर तो ते करतो. अशाच अधिकाराने तुम्हीपण बोला.”
10
येशूने हे ऐकले तेव्हा, तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या सोबत चालणाऱ्या लोकसमुदायाला तो म्हणाला, “हे लक्षपूर्वक ऐका: ह्या परराष्ट्रीय मनुष्यासारखा या पूर्वी कधीच कोणीही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला मला आढळला नाही. इस्राएल मध्ये देखील नाही, जेथे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा अशी मी अपेक्षा केली, की कोणी तरी माझ्यावर एवढा विश्वास ठेवावा!
11
मी तुम्हांला खरोखर सांगतो जेव्हा देव सर्वांवर पूर्णपणे राज्य करील तेव्हा पुष्कळ परराष्ट्रीय लोक देखील माझ्यावर विश्वास ठेवतील, आणि ते दूर-दूरच्या देशातून येतील, जे दूर पूर्वेकडे आहेत ते सुद्धा आणि जे दूर पश्चिमेकडे आहेत ते सुद्धा येतील, आणि ते अब्राहाम, इसहाक, आणि याकोब ह्यांच्या सोबत भोजनास बसतील.
12
परंतु यहूद्यांनी देवाला स्वतःवर राज्य करू दिले पाहिजे होते, देव त्यांना नरकात फेकून देईल, जेथे पुर्णपणे अंधकार आहे. तेथे त्यांना होत असलेल्या त्रासामुळे ते रडतील आणि त्यांना होत असलेल्या तीव्र वेदनेमुळे ते आपले दात चावतील.”
13
मग येशू अधिकाऱ्याला म्हणाला, “घरी जा. मी दूर अंतरावरून तुझ्या सेवकाला बरे करावे, व तसेच व्हावे असा जो तू विश्वास ठेवला, तसेच होईल.” मग तो अधिकारी घरी गेला आणि त्याला त्याचा सेवक त्याच घटकेस बरा झालेला समजले जेव्हा येशू म्हणाला होता की तो त्याला बरे करील.
शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी
14
येशू आणि त्याचे काही शिष्य पेत्राच्या घरी गेले तेव्हा, येशूने पेत्राच्या सासूला पाहिले. ती अंथरुणावर झोपलेली होती कारण तिला ताप आलेला होता.
15
त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व लगेचच तिचा ताप बरा झाला. मग ती उठली व तिने त्यांना जेवण वाढले.
16
त्याच संध्याकाळी शब्बाथ संपल्यावर, जमावाने ज्यांना भूतांनी वश केले होते, आणि इतर लोक जे आजारी होते, अशा पुष्कळ लोकांना येशूकडे आणिले. केवळ त्याच्या बोलण्याद्वारे त्याने भूते घालवली, आणि जे सर्व आजारी होते त्यांना त्याने आरोग्य दिले.
17
त्याने हे केले तेव्हा, यशया संदेष्ट्याने जे काही लिहिले ते खरे ठरले, ‘त्याने लोकांना त्यांच्या आजारांपासून मुक्त केले, आणि त्याने त्यांना बरे केले.’
शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी
18
येशूने आपल्या सभोवती लोकांची गर्दी पाहिली, परंतु त्याला आराम करण्याची गरज होती. परंतु त्याला तारवामधून सरोवरापलीकडे घेऊन जावे अशी त्याने आपल्या शिष्यांना आज्ञा केली.
19
जसे ते तारवाच्या दिशेने निघाले तेव्हा, यहूदी नियमशास्त्र शिकवणारा एक पुरुष त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे तुम्ही जाल तेथे मी तुमच्याबरोबर येईन.”
20
येशूने त्याला उत्तर दिले, “खोकडांस राहण्यासाठी जमिनीमध्ये बिळे, आणि पक्षांना आकाशात राहण्यासाठी घरटे आहेत, परंतु मी जरी मनुष्याचा पुत्र असलो तरी, माझ्याकडे घर नाही जेथे मी आराम करू शकतो.
21
आणखी एक पुरुष जो येशूच्या शिष्यांपैकी होता त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला प्रथम घरी जाण्याची परवानगी द्या. माझ्या पित्याच्या मरणानंतर मी त्याला पुरेन आणि मग मी तुमच्या बरोबर येईन.”
22
परंतु येशू त्याला म्हणाला, “आताच माझ्या बरोबर ये. असे लोक जे मेलेल्यात जमा आहेत, त्यांनाच आपले स्वतःचे लोक मरण्याची वाट पाहू दे.”
वादळ शांत करणे
23
त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य तारवामध्ये चढले, आणि त्यांनी गालील सरोवराच्या दिशेने तारवास हाकारणे सुरु केले.
24
लगेचच पाण्यामध्ये जोराचा वारा सुटला, आणि अतिशय मोठाल्या लाटा उचंबळत होत्या व त्याने तारू भरून जात होते. परंतु येशू झोपलेला होता.
25
त्यांनी जाऊन त्याला ऊठवीले, आणि त्याला म्हणाले, “प्रभू, आम्हांला वाचवा! आपण बुडणार आहोत!”
26
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही घाबरून जाऊ नये! मी तुम्हांला वाचवू शकतो इतका देखील तुमचा विश्वास नाही.” मग तो उठला आणि वाऱ्याला दटावले आणि लाटांना शांत होण्यास सांगितले. लगेचच वारा वाहणे थांबले आणि पाणी शांत झाले.
27
ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि ते एक एकमेकांशी म्हणू लागले, “हा मनुष्य निश्चितच एक असाधारण व्यक्ती आहे! सर्व गोष्टी ह्याच्या नियंत्रणात आहेत! वारा आणि लाटा देखील ह्याच्या आज्ञा पाळतात!”
गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त
28
जेव्हा ते सरोवराच्या पूर्वेकडील भागात आल्यावर, गदरेकर राहतात त्या प्रदेशात ते उतरले. मग भूतांनी वश केलेले दोन पुरूष मेलेल्या लोकांना ठेवतात त्या गुहेमधून बाहेर आले ते तेथेच राहत असत. कोणीही त्या वाटेने जाण्यास धजत नव्हते, कारण ते अत्यंत हिंसक आणि लोकांवर हल्ला करणारे होते.
29
लगेचच ते येशूवर ओरडले, “तू देवाचा पुत्र आहेस! म्हणून तुझा आणि आमचा काही संबंध नाही, आम्हांला एकटेच राहू दे! देवाने आमच्यासाठी नियोजीत केलेल्या शिक्षेच्या वेळे अगोदरच तू आम्हांला छळण्यासाठी आला आहेस काय?”
30
तेथे जवळपासच डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
31
म्हणून त्या दुष्टआत्म्यांनी येशूला विनंती केली आणि म्हणाले, “तू आम्हांला ह्या माणसांमधून बाहेर काढणार असशील, तर आम्हांला त्या डुकरांमध्ये पाठव!”
32
येशू त्यांना म्हणाला, “जर तुम्हांला हेच पाहिजे तर, जा!” मग दुष्टआत्म्यांनी त्या माणसांना सोडले व डुकरांमध्ये प्रवेश केला. लगेचच तो डुकरांचा संपूर्ण कळप धावत जाऊन कड्यावरून खाली पडला आणि पाण्यात बुडून गेला.
33
मग त्या डुकरांची राखण करणारे लोक घाबरून गेले आणि नगरात पळून गेले व झालेल्या सर्व गोष्टींविषयी, ज्या दोन माणसांना दुष्टआत्म्यांनी नियंत्रीत केले होते त्यांच्यासोबत देखील काय घडले हे वर्तमान कळवले.
34
मग असे झाले की त्या नगरात राहणारे सर्व लोक येशूकडे आले. त्यांनी त्याला आणि दुष्टआत्म्यांनी वश केले होते त्या दोन पुरूषांना पाहिले. तेव्हा ते येशूला त्यांचा प्रांत सोडून जाण्यास विनंती करू लागले.