6



गुप्त धर्माचरण

1 “जेव्हा तुम्ही चांगली कामे करता, तेव्हा इतर लोकांनी आपल्याला पाहावे या हेतूने तुम्ही ती कामे करणार नाही हे निश्चित करा. त्यांनी तुम्हांला पाहावे आणि तुमच्या विषयी चांगला विचार करावा असे करू नका. केवळ इतर लोकांनी तुमच्या विषयी चांगला विचार करावा या हेतूने जर तुम्ही चांगली कामे करता, तर तुमचा देव पिता जो स्वर्गात आहे, तो तुम्हांला कोणतेही प्रतिफळ देणार नाही.

गुप्त दानधर्म

2 म्हणून जेव्हा तुम्ही गरिबांना काहीतरी देता, जसे एखादा तुतारी वाजवत असता लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते, तसे त्यांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल असे करू नका. तसेच जे ढोंगी लोक सभास्थानात आणि रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून लोकांनी आपली प्रशंसा करावी या हेतूने करतात. हे लक्षात असू द्या की ते लोक ह्या ढोंगी लोकांची प्रशंसा करतात, परंतु ढोंगी लोकांना मिळणारे प्रतिफळ हेच आहे!

3 जसे ते करतात तसे करण्यापेक्षा, तुम्ही गरिबांना काहीतरी देता तेव्हा, तुम्ही काय करत आहात हे इतर लोकांना समजता कामा नये. 4 अशा प्रकारे, तुम्ही गरिबांना काहीतरी गुप्तपणे द्यावे. जेव्हा तुम्हांला कोणीही पाहत नाही, परिणामी, तुमचा देव पिता जो तुमचे निरीक्षण करत आहे, तुम्हांला प्रतिफळ देईल.
गुप्त प्रार्थना

5 “आणखी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा ढोंगी करतात तसे करू नका. त्यांना सभास्थानात आणि मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे आवडते, जेणे करून लोकांनी त्यांना पाहून त्यांच्याविषयी चांगला विचार करावा. हे लक्षात ठेवा की ते लोक त्यांची प्रशंसा करतात, परंतु खरोखर हेच त्यांचे प्रतिफळ आहे. 6 परंतु तुम्ही, जेव्हा प्रार्थना करता, तेव्हा आपल्या वैयक्तिक खोलीमध्ये जा आणि तुमचा देव जो पिता, ज्याला कोणीही पाहू शकत नाही त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी दार बंद करा. जेव्हा कोणी तुमचे निरीक्षण करत नाही तेव्हा तो तुमचे निरीक्षण करत आहे, आणि तोच तुम्हांला प्रतिफळ देईल. 7 तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा देवाला ‍‍न ओळखणारे लोक प्रार्थना करतांना जसे पुन्हा-पुन्हा तेच शब्द बोलतात तसे तुम्ही त्यांच्या सारखी प्रार्थना करू नये. त्यांना असे वाटते की ते जर जास्त शब्द बोलले तर, देव त्यांची प्रार्थना ऐकेल आणि जे त्यांनी मागीतले ते त्यांना देईल.

8 त्यांच्या सारखे पुन्हा-पुन्हा तेच शब्द बोलू नका, कारण तुम्ही त्याच्याकडे मागण्या अगोदर तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या देव पित्याला ठाऊक आहे.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना

9 म्हणून ह्या प्रकारे प्रार्थना करा:
‘हे पित्या, तू जो स्वर्गामध्ये आहेस,
प्रत्येकजण तुझा सन्मान करो.
10 प्रत्येकावर आणि प्रत्येक ठिकाणी तुच पूर्णपणे राज्य करावे.
पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण होवो, जशी स्वर्गामध्ये होते,
अगदी तसेच सर्वकाही घडावे.
11 आम्हांला प्रत्येक दिवसाचे आवश्यक अन्न दररोज दे.
12 ज्यांनी आमच्या विरोधात पाप केले त्यांना जशी आम्ही क्षमा केली आहे तशीच तू ही आमच्या अपराधांची क्षमा कर.
13 जेव्हा आम्ही मोहात पडतो तेव्हा आमच्या कडून चूकीच्या गोष्टी होऊ नये,
आणि जेव्हा सैतान आम्हांला इजा करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आम्हांला वाचव.’

14 तुमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या लोकांना क्षमा करा, कारण, तुम्ही असे करता तेव्हा, तुमचा, देव जो पिता स्वर्गामध्ये आहे, तुमच्या अपराधांची क्षमा करील. 15 परंतु जर तुम्ही इतर लोकांना क्षमा केली नाही, तर देव देखील तुमच्या पापांची क्षमा करणार नाही.
गुप्त उपास

16 देवाला संतोषविण्यासाठी तुम्ही उपास करता, तेव्हा ढोंगी लोकांप्रमाणे उदास दिसू नका. त्यांची मुखे उदास दिसतात जेणेकरून त्यांनी जेवण केलेले नाही आणि ते खुप चांगले आहे हे लोकांच्या लक्षात यावे असे ते करतात. ह्याकरीता इतर त्यांच्यविषयी चांगला विचार करतील, परंतु हे लक्षात ठेवा हेच केवळ ते प्रतिफळ जे त्या लोकांना मिळेल! 17 त्या ऐवजी, तुम्हापैकी प्रत्येकजण, जेव्हा उपास करतो, तेव्हा नेहमी प्रमाणे आपले केस विंचरावे आणि आपले तोंड धूवावे, 18 ह्या प्रमाणे तू उपास करीत आहे हे इतर लोकांना कळणार नाही. परंतु तुझा देव, पिता ज्याला कोणीही पाहू शकत नाही, तो तुझे निरीक्षण करील की तू काहीही खाल्ले नाही. जरी तुला कोणीही पाहिले नाही तरी तो तुला पाहतो, आणि तोच तुला प्रतिफळ देईल.
खरीखुरी संपत्ती

19 या पृथ्वीवर स्वार्थीपणाने आपल्या स्वतःसाठी खुप मोठ्याप्रमाणात पैसा आणि भौतिक वस्तू साठवून ठेवू नका, कारण पृथ्वीवरील सर्वगोष्टी नष्ट होऊन जाणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील गोष्टी नाश होतात, वस्तू गंजतात, आणि चोर येऊन चोरी करतात. 20 त्याऐवजी, देवाला संतोष मिळेल अशा गोष्टी करा. जर तुम्ही चांगली कामे केली, तर हे स्वर्गात संपत्ती साठवल्या सारखेच होईल. तेथे काहीही नाश होत नाही. स्वर्गामधील गोष्टी उध्वस्त देखील होत नाही. काही गंजत देखील नाही, आणि चोर येऊन चोरी करत नाही. 21 लक्षात असू द्या की जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्याच्या विषयी तुम्ही विचार करावा.
प्रकाश आणि अंधार

22 “तुमचे डोळे तुमच्या शरीरासाठी दिव्याप्रमाणे आहेत, ते तुम्हांला गोष्टी पाहण्यासाठी मदत करतात. म्हणून जर तुम्ही जसे देव त्या गोष्टींना पाहतो तसे पाहाल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. 23 परंतु तुमची दृष्टी जर चांगली नाही, तर तुम्हांला काहीही पाहता येणार नाही. तुम्ही पूर्णपणे अंधारात जाल. तुम्ही किती लोभी असाल!

24 “कोणीही एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या धन्यांची सेवा करू शकत नाही. तसे करण्याचा त्याने प्रयत्न जरी केला, तरी त्यांच्या पैकी एकाचा तो द्वेष करेल, आणि दुसऱ्या एकावर प्रीती करील, किंवा त्यांच्या पैकी एका सोबत विश्वासू राहील, आणि दुसऱ्याचा तिरस्कार करील. तसेच, तुम्ही एकाच वेळेस देवाची आणि पैशांची उपासना करू शकत नाही.”
चिंता आणि देवावर भिस्त

25 म्हणून मी सांगतो की तुम्हांला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींविषयी काळजी करू नका. आपल्याला खाण्यास अन्न आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी, किंवा घालण्यासाठी पुरेसे वस्त्र मिळतील किंवा नाही ह्याविषयी काळजी करू नका. जसे तुम्ही आपले जीवन जगता ते ह्या सर्व गोष्टींपेक्षा खुप महत्त्वाचे आहे. 26 पक्षांविषयी विचार करा. ते बीं पेरीत नाहीत, आणि पिकाची कापणी करीत नाहीत किंवा त्यांचा साठा करण्यासाठी कोठारे बनवत नाहीत. तरीही त्यांच्याकडे सर्वदा खाण्यासाठी अन्न आहे, कारण तुमचा देव जो पिता स्वर्गामध्ये आहे, तो त्यांना खाण्यासाठी अन्न पुरवतो. आणि तुम्ही सर्व त्या पक्षांपेक्षा खुप जास्त मोलाचे आहात! म्हणून देव तुमच्या गरजेचा पुरवठा करील ह्याची तुम्ही खात्री करू शकता!

27 केवळ काळजी करून, आपल्या आयुष्याची वर्षे वाढवण्यासाठी तुमच्या पैकी कोणीही सक्षम नाही. तुमच्या आयुष्याचा एक मिनिट सुद्धा वाढविण्यास तुम्ही सक्षम नाही! म्हणून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींविषयी तुम्ही काळजी करू नये.

28 आपल्याला घालण्यासाठी पुरेसे वस्त्र मिळतील किंवा नाही ह्यांविषयी देखील तुम्ही काळजी करू नये. ज्या प्रकारे रानातील फुले वाढतात त्यांच्याविषयी विचार करा. ते पैसा मिळवण्यासाठी काम करत नाही, आणि ते स्वतःचे वस्त्र बनवत नाही.

29 मी तुम्हांला सांगतो की शलमोन राजा, जो फार काळा पूर्वी होता, त्याने खुप सुंदर वस्त्रे घातली होती, परंतु त्याची वस्त्रे ह्या सुंदर फुलांपैकी एकासारखी देखील नव्हती.

30 देवाने रानातील झुडपांना खुप सुंदर बनवले आहे, परंतु ते रानात फार थोड्या वेळेसाठीच वाढतात. एका दिवसात त्यांची वाढ होते, आणि दुसऱ्या दिवशी लोक त्यांना सरपण म्हणून भट्टीत टाकून त्यांच्या विस्तवावर भाकरी भाजतात. परंतु देवासाठी रानातील झाडे आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात, आणि तुम्ही जास्त काळ जगता. म्हणून तुम्ही जे अविश्वासू आहात, देवावर भरवसा ठेवा! 31 म्हणून काळजी करून असे म्हणू नका, ‘आम्हाला खाण्यासाठी काहीतरी मिळेल का?’ किंवा ‘आम्हाला पिण्यासाठी काही मिळेल का?’ किंवा ‘आम्हाला घालण्यासाठी वस्त्र मिळतील का?’

32 जे देवाला ओळखत नाहीत तेच लोक अशा गोष्टींची सर्वदा काळजी करत राहतात. परंतु तुमचा देव जो पिता, जो स्वर्गात आहे, तुम्हांला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे हे त्याला ठाऊक आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या विषयी काळजी करू नये. 33 त्याऐवजी, देव आपल्यावर राज्य करील तेव्हा केवळ त्याचा स्वीकार करणे आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणे ह्यालाच तुमच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट बनवा. जर तुम्ही असे कराल, तर तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तो तुम्हांला देईल. 34 म्हणून दुसऱ्या दिवशी तुमच्या सोबत काय होणार आहे ह्याची काळजी करू नका, कारण जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा ह्या सर्वांबाबत तुमच्याकडे पुरेसे असेल. म्हणून पुढे येणाऱ्या वेळे विषयी काळजी करू नका.