22
लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत

1 येशूने यहूदी पुढाऱ्यांना आणखी इतर बोधकथा सांगितल्या त्यापैकी ही एक बोधकथा आहे: 2 देव राजा म्हणून सर्वत्र राज्य करेल, तेव्हा तो एका राजासारखा असेल ज्याने आपल्या सेवकांना सांगितले की, त्यांनी त्याच्या मुलासाठी लग्नाची एक मेजवानी तयार करायला पाहिजे. 3 मेजवानी तयार झाली, तेव्हा त्याने आंमत्रित केलेल्या लोकांना लग्नाच्या मेजवानीला येण्याची त्यांची वेळ झाली आहे हे सांगण्याकरता राजाने आपल्या सेवकांना पाठवले. ते सेवक गेले आणि त्या लोकांना ते सांगितले. पंरतु आंमत्रित केले गेलेल्या लोकांना जाण्याची इच्छा नव्हती. 4 म्हणून राजाने त्या लोकांना मेजवानीला यावे हे सांगण्याकरता पुन्हा इतर काही सेवकांना पाठवले. तो त्या सेवकांना म्हणाला, “मी आंमत्रित केलेल्या लोकांना मेजवानीला या असे सांगा, मी जेवण तयार केले आहे. बैल आणि पुष्ट वासरे कापली आहेत आणि शिजवली आहेत. सगळ्या गोष्टी तयार आहे. आता लग्नाच्या मेजवानीला येण्याची तुमची वेळ झाली आहे. राजा तुम्हांला हे म्हणतो!”’’ 5 पंरतु सेवकांनी त्यांना सांगितलेल्यावर त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्यामधील काही जण त्यांच्या मालकीच्या शेतात गेले. इतर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गेले. 6 बाकीच्या काहीनीं राजाच्या सेवकांना पकडले, त्यांना वाईट वागणूक दिली, आणि त्यास जीवे मारले. 7 राजाने जे काही घडले ते ऐकले तेव्हा, तो फार क्रोधित झाला. त्याने त्या खुन्यांना ठार मारण्याची आणि ते शहर जाळून टाकण्याची आज्ञा सैनिकास दिली. 8 त्याच्या सैनिकांनी हे केल्यानंतर, राजा आपल्या सेवकांना म्हणाला, मी मेजवानी तयार केली आहे, परंतु ज्या लोकांना आमंत्रण देण्यात आले होते ते येण्यास पात्र नाहीत. 9 म्हणून मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यावर जा, तुम्हांला आढळेल त्या कोणालाही सांगा की, त्यांनी लग्नाच्या मेजवानीला यायलाच पाहिजे.’ 10 मग ते सेवक तेथे गेले, आणि जे जे त्यांना भेटले त्या प्रत्येकाला त्यांनी जमा केले. त्यांनी दुष्ट लोक आणि चांगल्या लोक या दोघांना एकत्रित केले. लग्नाच्या मेजवानी जेथे होणार होती त्या ठिकाणाच्या दिवाणखान्यात त्यांना ते घेऊन आले. दिवाणखाना लोकांनी भरून गेला होता. 11 राजाने अतिथींना भेटण्यासाठी दिवाणखान्यात प्रवेश केला, तेव्हा लग्नाच्या मेजवानीसाठी अतिथींना घालण्यासाठी दिला गेलेला पोशाख न घातलेला कोणाएकाला त्याने तेथे पाहिले. 12 राजा त्याला म्हणाला, ‘मित्रा, लग्नाच्या ठिकाणी अतिथी घालतात तो पोशाख तू घातलेला नाहीस म्हणून तू ह्या दिवाणखान्यात मुळीच प्रवेश करायला नाही पाहिजे!’? त्या मनुष्याने काहीही सांगितले नाही, कारण काय बोलावे ते त्याला कळत नव्हते. 13 तेव्हा राजाने आपल्या सेवकांना म्हटले, ‘या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि बाहेर जिथे निर्भिड अंधार आहे तेथे त्याला टाका, तेथे लोक रडतात आणि त्यांना वेदना होत असतात म्हणून ते आपले दात विचकवतात.’” 14 मग येशू म्हणाला, देवाने अनेकांना त्याच्याकडे येण्यासाठी आमंत्रित केले आहे, परंतु तेथे असण्यासाठी काही लोक आहेत ज्यांच्यासाठी त्याने निवडले आहे. परंतु केवळ काही लोक आहेत जे त्यांनी तेथे असण्यासाठी निवडले आहेत असा या बोधकथेचा मुद्दा आहे.”

कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न

15 येशूने हे सांगितले, तेव्हा त्याने काहीतरी बोलावे म्हणून आपण त्याला कसे प्रेरित करू शकतो जेणेकरून मग त्याच्यावर आरोप ठेवण्यास त्यांना शक्य होईल ही योजना आखण्याकरता परूशी एकत्र जमले होते. 16 इस्राएली लोकांनी केवळ कर भरण्यासाठी यहूदी आधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या करांची भरपाई करावी, ही विचारसरणी असलेल्या शिष्यांपैकी काहींना त्यांनी त्याच्याकडे पाठवले. त्यांनी राजा हेरोदाचे समर्थन करणाऱ्या काही सदस्यांनाही पाठवले. इस्राएली लोकांनी केवळ रोमी सरकारला द्यावा लागणाराच कर भरावा असा त्या पक्षातील विचार करायचे. ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्यांनी येशूला सांगितले, “गुरूजी, आम्हांला माहित आहे की आपण खात्रीलायक आहात आणि आपण आमच्याबद्दल देवाची इच्छा काय आहे याबद्दल सत्य शिकवता. कोणी आपल्याबद्दल काय म्हणेल म्हणून तुम्ही जे काही शिकवता त्याच्यात कधीही बदल करत नाहीत, जरी तो एक महत्वाचा व्यक्ती आहे जो आपण काय शिकवता ते आवडत नाही. 17 तर या प्रकरणाबद्दल आपणास काय वाटते ते आम्हांला सांगा: आम्ही रोमी सरकारला कर द्यावा, किंवा नाही, हे योग्य आहे का? 18 परंतु येशूला हे माहित होते की त्यांना जे करायचे होते ते खरोखर वाईट आहे. (यहूदी अधिकार आणि रोमी अधिकार ह्यांच्या विषयी त्याने असे काही बोलावे जेणेकरून तो अडचणीत सापडावा अशी त्यांची इच्छा होती.) यहूदी अधिकाऱ्यांकडून किंवा रोमी अधिकाऱ्यांकडून त्रास होईल असे काही म्हणण्यास ते त्याला भाग पाडत होते. मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ढोंगी आहात; मी काहीतरी बोलावे असे तुम्ही इच्छिता ज्यासाठी तुम्हांला माझ्यावर आरोप करता येईल. 19 रोमन कर भरण्यासाठी जे नाणे लोक वापरतात ते मला दाखवा.” म्हणून त्यांनी दिनार नावाचे एक नाणे त्याला दाखवले. 20 मग तो त्यांना म्हणाला, “या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि कोणाचे नाव यावर लिहिलेले आहे?” 21 त्यांनी उत्तर दिले, “त्यात रोमी सरकारचे प्रमुख कैसर याचे चित्र आणि नाव आहे.” मग तो त्यांना म्हणाला, “तर सरकारला जे आवश्यक आहे ते त्यांना द्या, आणि जे देवाचे आवश्यक ते त्याला द्या.” 22 येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले, तेव्हा त्याच्या उत्तरावर कोणीही आरोप करण्यास सक्षम नाही म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते येशूला सोडून गेले.
पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न

23 दरम्यान त्याच दिवशी, काही सदूकी येशूकडे आले. लोक मेल्यानंतरही ते पुन्हा जिवंत होऊ शकत नाही असा विश्वास धरणारा तो एक यहूदी वर्ग होता. ते येशूला एक प्रश्न विचारू इच्छित होते. 24 ते त्याला म्हणाले, “गुरूजी, मोशेने शास्त्रलेखात लिहिले आहे की, ज्याला कुठलेही मूलबाळ नव्हते असा एखादा मनुष्य मरण पावला, तर त्याच्या भावाने त्या मृत मनुष्याच्या विधवेशी लग्न करावे जेणेकरून तिला एक मुलगा असू शकेल. जो मृत्यू पावला त्याचा मुलगा म्हणून ह्या मुलाला समजण्यात येईल, आणि त्याप्रमाणे त्या मृत मनुष्याचा वंश चालेल. 25 आता, आमच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटूंबात सात मुले होती. सर्वात मोठ्याने कुणासोबत तरी विवाह केला. तो व त्याच्या बायकोला मुले झाले नाही आणि तो मरण पावला. मग दुसऱ्या भावाने त्या विधवेशी विवाह केला. पण तो देखील एखादे मूल न होताच मृत्यु पावला. 26 तिसऱ्या भावाच्या बाबतीतही, आणि ज्यांनी त्या समान विधवेशी एक एक करून विवाह केला त्या इतर चार भावाच्या बाबतीतही तसेच घडले. 27 शेवटी, त्या महिलेचाही मृत्यु झाला. 28 तेव्हा, देव मेलेल्यांमधून लोकांना उठवील त्या वेळी, सात भाऊ होते त्यातील कोण तिचा पती होईल असे तुम्हांला वाटते? लक्षात ठेवा की त्या सर्वांनी तिच्याशी विवाह केला होता.” 29 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुमच्या विचार करण्यामध्ये तुम्ही नक्कीच चुकत आहात, शास्त्रलेखात काय लिहले ते तुम्हांला माहित नाही. देवाकडे लोकांना पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे हे देखील तुम्हांला माहित नाही. 30 खरे हे आहे की ती स्त्री त्यापैकी कोणाचीही पत्नी होणार नाही, कारण देवाने सर्व मृत गोष्टींना जिवंतपणाचे अभिवचन दिले होते त्यामुळे कोणीही लग्न करणार नाही. त्याऐवजी, लोक स्वर्गात देवदूतासारखे असतील. ते लग्न करणार नाहीत. 31 पण मृत लोक पुन्हा जिवंत होतात त्याबद्दल देव काहीतरी म्हटलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते वाचलेले आहे. अब्राहाम, इसहाक आणि याकोब मरण पावल्यानंतर, देव मोशेला म्हणाला, 32 ‘मी तो देव आहे ज्याची अब्राहाम उपासना करायचा, मी तो देव आहे ज्याची इसहाक उपासना करायचा, मी तो देव आहे ज्याची याकोब उपासना करायचा.’ देवाची उपासना करणारे ते लोक मृत नाहीत. तर ते जिवंत लोक आहेत जे देवाची उपासना करतात. त्यांचे आत्मे अजूनही जिवंत आहेत ह्याची आम्हांला खात्री आहे!”

33 येशूने शिकवलेले लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.
सर्वात मोठ्या आज्ञेविषयी प्रश्न

34 येशूने सदूकी लोकांना अशाप्रकारे उत्तर दिले की त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ते सदूकी विचारही करू शकले नाही हे परुश्यांनी ऐकले, तेव्हा त्याला त्यांनी काय म्हणावे म्हणून परूशी एकत्रित जमले. मग ते त्याच्याकडे गेले. 35 देवाने मोशेला दिलेले नियम काळजीपूर्वक अभ्यास केलेला आणि एक वकील असलेला एक मनुष्य त्याच्यांमध्ये होता. येशूबरोबर त्याला वादविवाद करायचा होता. त्याने त्याला विचारले, 36 “गुरूजी, देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे?” 37 येशूने त्याचे उत्तर म्हणून तो शास्त्रलेख बोलला, “प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर. आपल्या सर्व इच्छेप्रमाणे त्याच्यावर प्रीती कर, आपल्याला अनुभवत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये, आणि आपण सर्व विचारांमध्ये त्याच्यावर प्रीती कर. 38 देवाने मोशेला दिलेल्या नियमांत ही सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे. 39 प्रत्येकांनी आज्ञा पाळलीच पाहिजे अशी ही पुढील सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे: ‘आपण ज्या लोकांशी संर्पकात येतो त्याच्यांवर जसे आपण स्वत:वर प्रीती करतो तसेच त्यांच्यावरही प्रीती करावी.’ 40 मोशेने शास्त्रवचनामध्ये लिहिलेले प्रत्येक नियम आणि सदेष्ट्यांनीही लिहिलेले सर्व काही ह्या दोन आज्ञांवरच आधारित आहे.
मशीहा विषयी प्रश्न प्रतिसादात त्याला सांगण्यासाठी अगदी एक शब्द विचार करण्यास सक्षम.

41 येशूजवळ परूशी अजूनही एकत्र जमलेले असतांना, त्याने त्यांना प्रश्न केला, 42 “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “तो दावीदाचा पुत्र आहे.” 43 येशू त्यांना म्हणाला, “ख्रिस्त हा जर दावीदाचा पुत्र आहे, तेंव्हा दावीदाने त्याला प्रभू म्हणून म्हंटले नाही, तर दावीदाला पवित्र आत्म्याने म्हणण्यास सांगितले.” 44 दावीदाने शास्त्रलेखात ख्रिस्ताबद्दल असे लिहिले आहे: ‘देव माझ्या प्रभुला म्हणाला, “माझ्या उजव्या बाजूला येथे बस, जेथे मी तुला थोर सन्मान देईन.”’ 45 म्हणून तेव्हापासून, दावीद राजाने ख्रिस्ताला ‘आपला प्रभू’ असे म्हटले आहे, ख्रिस्त दावीदाच्या कुळातील कोणीही असू शकत नाही! तो दावीदापेक्षाही फार थोर असणे आवश्यक आहे!” 46 येशू जे बोलला ते ऐकलेल्यांना कुणा एकालाही त्याला सांगण्यासाठी प्रत्युउत्तर देण्यासाठी अगदी एक शब्दही सुचेना. त्यानंतर, त्याला जाळ्यात पकडण्यासाठी आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.