20
द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत
1
देव त्याच्या लोकांवर राज्य करण्यास सुरूवात करेल, तेव्हा देव लोकांना कसे प्रतिफळ देईल हे स्पष्ट करण्यासाठी, ह्याची तुलना एका संपत्तीच्या मालकाने काय केले त्यासोबत मी करीन. अगदी पहाटेच्या वेळी मालमत्तेचा मालक बाजारपेठेमध्ये गेला, ज्यांना काम हवे होते त्यासाठी लोक नाक्यावर एकत्र जमले होते. त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यासाठी मोलाने मजुर आणण्यासाठी तो तेथे गेला होता.
2
त्याने ज्या लोकांना काम करण्यासाठी आणले होते त्यांना एक दिवसासाठी काम करण्याकरीता प्रमाण वेतन देण्याचे वचन दिले. मग त्याने त्यांना आपल्या द्राक्षमळ्यास पाठवून दिले.
3
त्याच दिवसाच्या सकाळी नऊ वाजता तो पुन्हा बाजारात गेला. तेथे त्याने काम नसलेले अनेक लोक पाहिले.
4
तो त्यांना म्हणाला, जसे इतर लोकांनी केले तसे, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात जा, आणि तिथे काम करा. आणि जे काही योग्य वेतन आहे ते मी तुम्हांला देईन.’ म्हणून ते देखील त्याच्या द्राक्षमळ्यात गेले आणि काम करण्यास सुरूवात केली.
5
दुपारी तीन वाजता तो पुन्हा बाजारपेठेकडे गेला आणि ज्याने त्यांना एक वाजवी वेतन देण्याचे वचन दिले ते इतर मजुर त्याला सापडले.
6
पाच वाजता तो पुन्हा बाजारपेठेत गेला आणि तेथे उभे असलेले काम नसलेले काही लोक त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
7
त्यांनी त्याला उत्तर दिले, ‘कारण आम्हांला कोणीही काम दिले नाही.’ तो त्यांना म्हणाला, मी तुम्हांला काम देतो. जसे इतर लोकांनी केले तसे ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात जा, आणि तिथे काम करा.’ म्हणून ते गेले.
8
संध्याकाळी झाली, तेव्हा द्राक्षमळ्याचा मालक आपल्या व्यवस्थापकाला म्हणाला, ‘मजुरांना येण्यास सांग जेणेकरून तुला त्यांचे वेतन देता येईल. पाहिल्यांदा, ज्यांनी अगदी शेवटी कामाला सुरूवात केली त्यांना अगोदर मजुरी दे, आणि नंतर ज्यांनी अगदी सुरूवातीला कामाला सुरूवात केली त्यांना शेवटी मजुरी दे.’
9
त्या व्यवस्थापकाने दुपारी पाच वाजेपर्यंत काम सुरू न करणाऱ्या प्रत्येक मजुरांना एक दिवसाचे प्रमाण वेतन दिले.
10
अगदी पहाटेच काम सुरू करणारे मजुर आपली मजुरी घेण्याकरता गेले, तेव्हा ते प्रमाण वेतन पेक्षा अधिक पैसे प्राप्त होतील असा विचार ते करू लागले. पण त्यांनाही केवळ प्रमाण वेतन प्राप्त झाले.
11
मग त्यांना मिळालेले वेतन योग्य नाही असा विचार ते करू लागले, म्हणून त्यांनी द्राक्षमळ्याच्या मालकाकडे तक्रार केली.
12
ते त्याला म्हणाले, ‘तुम्ही न्यायी नाही! त्या मजुरांनी आमचे सर्व काम झाल्यावर उरलेल्या शेवटच्या वेळेत काम सुरू करून केवळ एक तासच काम केले! पंरतु तुम्ही आमच्या जितके तितकेच वेतन त्यांनाही दिले! आम्ही मात्र उन्हातान्हात कष्ट केले!’
13
द्राक्षमळ्याचा मालक तक्रार करणाऱ्यांपैकी एकाला म्हणाला, ‘मित्रा, मी तुझ्याबाबतीत अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर एका प्रमाण वेतनावर संपूर्ण दिवस काम करायला सहमत झाला होतास.
14
तर मला तक्रार करू नकोस! तुझी मजुरी घे आणि चालायला लाग! मी तुला जे काही दिले तेवढेच वेतन तुमचे सर्व काम सुरू झाल्यानंतर शेवटी काम सुरूवात करणाऱ्या मजुरांना देण्याची माझी इच्छा होती.
15
निश्चितपणे माझ्या पैशाचा खर्च मला वाटेल तसा करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही का? माझ्या उदारतेबद्दल तू माझा मत्सर करू नये!”’
16
मग येशू आम्हांला म्हणाला, त्याचप्रमाणे, “जे आता कमी महत्त्वपूर्ण वाटतात देव काही लोकांना चांगले प्रतिफळ देईल, आणि तो काही लोकांना प्रतिफळ देणार नाही जे आता जास्त महत्वपूर्ण वाटतात.”
येशूने आपल्या मृत्युबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य
17
येशू यरूशलेमकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बारा शिष्यांसोबत चालत जात असता, तेव्हा त्याला त्यांच्याशी एकांतात बोलता यावे म्हणून त्याने त्यांना एकाबाजूला घेतले. मग तो त्यांना म्हणाला,
18
“लक्षपूर्वक ऐका! आम्ही आता वर यरुशलेमेस जात आहोत. आम्ही तेथे असतांना, मला, मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यासाठी कोणीतरी मुख्य याजक आणि यहूदी नियमांना शिकवणाऱ्या माणसांना मदत करेल, आणि ते मला परीक्षेत टाकतील. ते माझ्यावर दोष लावतील आणि त्यासाठी मला मरणदंड व्हावा असे म्हणतील.
19
मग त्यांना माझी थट्टा करता यावी, फटके मारता यावे, आणि मला वधस्तंभावर खिळवून मारून टाकता यावे म्हणून परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु त्या नंतर तिसऱ्या दिवशी, देव मला पुन्हा जिवंत करील.”
ऐहिक सन्मानाप्रीत्यर्थ विनंती
20
त्यानंतर जब्दीच्या पुत्राची आई, याकोब आणि योहान, ह्या तिच्या दोन मुलांना घेऊन येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली आणि तिच्यावर त्याने उपकार करावे म्हणून तिने त्याला एक विनंती केली.
21
येशू तिला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” ती त्याला म्हणाली, “तुम्ही राजा व्हाल तेव्हा माझ्या या दोन पुत्रांना सर्वात प्रतिष्ठेच्या ठिकाणी, एक तुमच्या उजवीकडच्या हाताशी आणि दुसरा डावीकडच्या हाताशी बसण्याची परवानगी द्या.”
22
तेव्हा येशू तिला आणि तिच्या मुलांना म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! मी जे दुःख सहण करणार आहे ते दुःख तुम्हांला सहन होईल काय?” याकोब आणि योहानाने त्याला उत्तर दिले, होय, आम्ही ते करू शकतो.”
23
मग येशू त्यांना म्हणाला, “होय, मी जसे दुःख सहन करू शकतो तसे तुम्ही करू शकाल. पण कोण माझ्या बाजूला बसून माझ्याबरोबर राज्य करेल हे निवडणारा मी कोणी नाही. तर देव, माझा पिता, ज्या एकाला तो निवडतो त्याला ती जागा देतो.”
24
याकोब आणि योहानाने केलेल्या विनंतीला इतर दहा शिष्यांनी ऐकले तेव्हा ते त्याच्यांवर रागावले कारण त्यांना देखील सन्मानांच्या पदांवर येशूबरोबर राज्य करायचे होते.
खरे मोठेपण
25
मग येशूने त्या सर्वांना एकत्रित बोलावले आणि त्यांना म्हटले, “तुम्हांला माहीती आहे की, जे परराष्ट्रीयांवर राज्य करतात ते फार शक्तिशाली आहेत असे दाखविण्यात त्यांना आंनद वाटतो. त्यांच्या मुख्य राज्यकर्त्यांना आपल्या हाताखालील लोकांना आज्ञा देण्यास आनंद वाटतो.
26
पण तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नये. त्याउलट, तुम्हापैकी प्रत्येकजण जो देवाने त्याच्याबद्दल महत्वाचा म्हणून विचार करावा असे इच्छित असला तर त्याने नक्कीच इतरांकरता एक सेवक व्हायला पाहिजे.
27
होय, आणि तुम्हापैकी प्रत्येकजण जो देवाने त्याच्याबद्दल अति महत्वाचा म्हणून विचार करावा असे इच्छित असला तर त्याने नक्कीच इतरांकरता एक दास व्हायला पाहिजे.
28
तुम्ही माझे अनुकरण करायलाच पाहिजे. माझी सेवा इतरांनी करावी म्हणून मी आलो नाही. त्याउलट, इतरांची सेवा करायला आणि माझा प्राण त्यांनी घेण्याची परवानगी त्यांना मी द्यावी ह्यासाठी मनुष्याचा पुत्र म्हणजे मी आलो आहे. जेणेकरून, अनेक लोकांना त्यांच्या पापांबद्दल होणाऱ्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी खंडणी म्हणून माझे मरण असेल.”
दोन आंधळ्यांना दृष्टिदान
29
ते यरीहो शहर सोडत असतांना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.
30
ते तेथून जात असतांना, रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते असे त्यांनी पाहिले. त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू, दावीदाच्या पुत्रा, तुम्ही ख्रिस्त आहात! आमच्यावर दया करा!”
31
जमावातील लोकांनी त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते आंधळे मनुष्य अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र, तुम्ही ख्रिस्त आहात! आमच्यावर दया करा!”
32
मग येशू थांबला आणि त्याच्याजवळ येण्याकरता त्यांना बोलावले, मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
33
ते त्याला म्हणाले, “प्रभू, आमच्या डोळ्यांना बरे करा जेणेकरून आम्ही पाहू शकू!”
34
येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.