आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या पहाटेस त्या येशूच्या कबर जवळ गेल्या होत्या [२८:१]. प? येशूच्या कबरेवरील शोंड कशी लोटली होती?
प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला आणि त्याने धोंड एकीकडे लोटली [२८:२].
जेंव्हा त्यांनी स्वर्गदूताला पाहिले तेंव्हा ते फारच भ्याले आणि मृतप्राय झाले [२८:४].
येशू उठला असून तो त्यांच्यापुढे गालीलामध्ये जाणर असल्याचे स्वर्गदूताने त्यांना सांगितले [२८:५-७].
त्या स्त्रियां येशूला भेटल्या आणि त्यांनी त्याचे चरण धरले आणि त्याला नमन केले [२८:८-९].
मुख्य याजकांनी पहारेक-यांना पुष्कळ पैसे दिले आणि येशूच्या शिष्यांनी येशूचे शरीर चोरले असे सांगावयास सांगितले [२८:११-१३].
शिष्यांनी त्याल नमन केले, परंतु कित्येकांस संशय वाटला [२८:१७].
येशूने म्हटले की स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला दिला गेला आहे [२८:१८].
येशूने त्याच्या शिष्यांना लोकांना शिष्य करण्यांस, त्यांना बाप्तिस्मा देण्यांस, आणि जे कांही त्याने त्यांना आज्ञापिले होते ते सर्व त्यांना पाळावयास शिकविण्यास सांगितले [२८:१९-२०].
येशूने त्याच्या शिष्यांना पित्याच्या, पुत्राच्या, व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्यांस सांगितले [२८:१९].
युगाच्या समाप्तीपर्यंत त्यांच्याबरोबर राहाण्याचे त्याने त्यांना वचन दिले [२८:२०].