Matthew 23

Matthew 23:1

शास्त्री व परूशी लोक मोशेच्या आसनावर बसलेले आहेत म्हणून येशूने लोकांना त्यांच्या शिकवणीबद्दल काय करण्यांस सांगितले?

शास्त्री आणि परूशी लोकांनी मोशेच्या आसनावरून जे कांही शिकविले त्याचे अनुसरण करण्यांस येशूने लोकांना सांगितले [२३:२-३].

शास्त्री आणि परूशी लोकांच्या कृतींचे अनुकरण करू नका असे येशूने लोकांना का सांगितले?

येशूने लोकांना त्यांच्या कृतींचे अनुकरण करू नका असे सांगितले कारण ते जे सांगतात त्याप्रमाणे आचरण करीत नाहीत [२३:३].

Matthew 23:4

शास्त्री आणि परूश्यांनी कोणत्या उद्देशाने त्यांची कामें केली?

त्यांची सर्व कामें लोकांनी पाहावी म्हणून शास्त्री आणि परूशी लोकांनी त्यांची कामें केली [२३:५].

Matthew 23:8

आपला एक पिता आणि एक गुरु कोण आहे असे येशूने म्हटले?

जो स्वर्गांत आहे तो आपला पिता आहे आणि ख्रिस्त आपला गुरु आहे असे येशूने म्हटले [२३:८-१०].

Matthew 23:11

जो स्वत:ला उंच करतो आणि जो स्वत:ला नम्र करोत त्याला देव काय करील?

देव स्वत:ला उंच करितो त्याला देव नम्र करील व जो स्वत:ला नम्र करितो त्याला देव उंच करील [२३:१२'.

Matthew 23:13

जेंव्हा शास्त्री आणि परुशी एखाद्याला त्यांच्या अनुयायी करतात म्हणजे कोणाचा पुत्र करतात?

जेंव्हा शास्त्री आणि परुशी एखाद्याला त्यांच्या अनुयायी करतात म्हणजे ते त्याला त्यांच्यापेक्षा दुप्पट नरकपुत्र करतात [२३:१५]. प? शास्त्री आणि परूशांच्या वर्तनाचे वर्णन करणा-या अशा कोणत्या शब्दाने येशूने वारंवार त्यांना संबोधले आहे?

येशूने शास्त्री आणि परूशी लोकांना वारंवार ढोंगी म्हणून संबोधले आहे [२३:१३-१५, २३, २५, २७, २९].

Matthew 23:16

शपथेने बांधले जाण्यासंबंधी, शास्त्री आणि परूशी लोकांच्या शिकवणी बद्दल येशूने काय सांगितले?

येशूने म्हटले की शास्त्री आणि परूशी हे आंधळे वाटाडी अंड आंधळे मूर्ख होते [२३:१६-१९].

Matthew 23:23

शास्त्री आणि परुशी लोक पुदिना, बडीशेप, व जिरे ह्यांचा दशमांश देत होते तरीहि ते काय करण्यांत अयशस्वी झाले?

शास्त्री आणि परुशी लोक नियमशास्त्र पालन, न्याय, दया, आणि विश्वास ह्या महत्वाच्या गोष्टीं करण्यांत अयशस्वी ठरले होते [२३:२३].

Matthew 23:25

शास्त्री आणि परूशी लोक काय शुद्ध करण्यांत अयशस्वी झाले होते?

शास्त्री आणि परूशी लोक त्यांच्या प्याल्याला आंतून स्वच्छ करण्यांत अयशस्वी झाले होते, जेणेकरून बाहेरून सुद्धा स्वच्छ झाला असता [२३:२५-२६].

Matthew 23:27

शास्त्री आणि परूशी आंतून कशाने भरलेले होते?

जुलूम, असंयम, ढोंगीपणा, आणि अनीतीने भरलेले होते [२३:२५, २८].

Matthew 23:29

शास्त्री आणि परूश्यांच्या पूर्वजांनी देवाच्या संदेष्ट्यांना काय केले होते?

शास्त्री आणि परूश्यांच्या पूर्वजांनी देवाच्या संदेष्ट्यांनामारून टाकले होते [२३:२९-३१].

Matthew 23:32

शास्त्री आणि परूश्यांना कोणत्या न्यायदंडाचा करावा लागेल?

शास्त्री आणि परुशी ह्यांना नरकदंडाचा सामना करावा लागेल [२३:३३].

Matthew 23:34

येशू ज्या संदेष्ट्यांना, ज्ञानी लोकांना, व शास्त्र्यांना शास्त्री आणि परूशी ह्यांच्याकडे पाठविणार आहे त्यांना ते काय करतील असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले की ते कांहींना वधस्तंभावर खिळवतील, कित्येकांना फटके मारतील व नागरोनगरी त्यांचा पाठलाग करतील [२३:३४].

त्यांच्या वर्तनाचा परिणाम म्हणून शास्त्री आणि परूशी ह्यांच्यावर कसला दोष येईल?

पृथ्वीवरील सर्व नीतिमान लोकांच्या रक्तपाताचा दोष शास्त्री आणि परूशी लोकांवर येईल [२३:३५].

कोणत्या पिढीत ह्या गोष्टीं घडतील असे येशूने सांगितले?

ह्या पिढीत ह्या सर्व गोष्टीं घडतील असे येशूने म्हटले [२३:३६].

Matthew 23:37

यरूशलेमेच्या मुलांबाळांसाठी येशूची काय इच्छा होती, आणि ती का पूर्ण झाली नाही?

यरूशलेमेच्या मुलांबाळांना एकवटावयाची येशूची कितीदा तरी इच्छा होती, परंतु ते त्याच्यासाठी सहमत झाले नव्हते [२३:३५].

आता यरूशलेमेचे घर कसे सोडले आहे?

आता यरूशलेमेचे घर भन्नाट असे सोडले आहे [२३:३८].