1 आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.
10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; म्हणून अब्राम खाली मिसर देशामध्ये राहायला गेला. कारण देशात तीव्र दुष्काळ पडला होता. 11 मिसर देशात प्रवेश करण्यापूर्वी अब्राम आपली पत्नी साराय हिला म्हणाला, “पाहा मला माहीत आहे की, तू अतिशय सुंदर स्त्री आहेस. 12 मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ही त्याची पत्नी आहे, आणि मग तुझ्यासाठी ते मला मारून टाकतील, परंतु तुला जिवंत ठेवतील. 13 म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांस सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.” 14 अब्रामाने जेव्हा मिसर देशात प्रवेश केला, तेव्हा तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे. 15 मिसर देशाचा राजा फारो याच्या राजकुमारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्याजवळ तिच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला राजाच्या घरी घेऊन जाण्यात आले. 16 तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले. त्यास मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले. 17 अब्रामाची पत्नी साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकांस भयंकर पीडांनी पीडले. 18 तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, “तू हे माझ्याबाबत का केलेस? साराय तुझी पत्नी आहे हे तू मला का सांगितले नाहीस? 19 ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला पत्नी करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी पत्नी तुला परत करतो, तिला घेऊन जा.” 20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या माणसांना आज्ञा दिली. तेव्हा अब्राम व त्याची पत्नी साराय यांनी आपले सर्वकाही बरोबर घेऊन मिसर सोडले.