अध्याय २

येशुना जन्म 1 ते काळम आसा व्ह्यना कि कैसर ओगुस्त यान्ह् आसा सरकारी आदेश काढणा कि, रोमन राज्यम ऱ्हयणारे प्रत्येक व्यक्तिंन आपले गावी जाई आपला नाव सरकारी पुस्तकमं नोंदवावा. 2 कुरीनीय हाय सिरीयाना अधिकारी आस्तानी हाय पहिल्यांदाच घडणा. 3 तव्हा प्रत्येकजण आपला नाव नोंदवणेसाठी सगळे कुटुंबसहित आपले गावी गयत. 4 योसेफ आपले कुटुंबसहित गावत्याव निघणा, मरिया जिन्हे बरोबर त्यान्हा लगीन ठरणाल ती गरोदर आस्तानी तिला पण संग लीन्हाल. 5 योसेफ हाय दाविद्ने वंशना आसल्यामुळ तो गालील प्रांतमधले नासरेत गावंमहित यहूदा प्रांतमधले बेथलेम गावंम गयत. बेथलेम हाय दाविदना गाव आसनाल. तय योसेफ व मरिया यासं सार्वजनिक पुस्तकम आपला नाव नोंद्व्या. 6 ते बेथलेमम आल्यावर, जे ठिकाणी प्रवाशसला ऱ्हव्हानी जागा आसनेल, तय त्यासाला जागा मिळणी नाहा. त्यानेमुळ त्यासला गोठाम ते रात्री थांबवानि लागणा. ते घटकाला ती वेळ वन्ही, 7 जव्हा मरीयान आपले पहिले पोऱ्याला जन्म दिन्ही, तो तिन्हा पहिला पुत्र आसनाल. तिन्ह त्याला कपडाम गुंढाळी जनवारं जा गवत खात त्याजवर ठेवणी. 8 तेच रात्री काही मेंढपाळ बेथलेम जवळ आपलं सांभाळत ऱ्हयनलत 9 तेच वेळेस अचानक देवना दूत तय प्रगट व्ह्यना, सगळीकड पांढराशुभ्र प्रकाश पडणा, ता देवना महिमा दाखवत ऱ्हयणाल. हाय जोहि खूप घाबरनत. 10 पण देवदूतन त्यासाला आखणा, घाबरू नका, मे तुम्हाला चांगली बातमी आखवानी वन्हां आसं, ती सगळासने फायदानी आसं, त्यानेमूळ तुम्हू खूप आनंदी व्हाल. 11 आज दाविद्ने गावमं ऐके बाळकना जन्म व्ह्यना आसं, तो तुम्हाला तुम्ह्ने सगळे पापपहिन वाचवी! तोच देवनं पाठवलेला मसीहा आसं. 12 तुम्हू त्याला कसं ओळखाल, ता आसा बेथलेमम ता बाळ ऐक जनवरासने गव्हाणम कपडाम गुंडाळी ठेवलेला दिसहि. 13 अचानक तय देवदूतना मोठा समुदाय वन्हा व ते दुसरे दुतला सामील व्हयनत, ते सगळ देवनी स्तुती करत अखनत, 14 सर्व दूत आकाशमं देवनी स्तुती करोत ! आन पृथ्वीवर ते लोकासला शांती आसो जे देवला प्रसन्न करणारं आसत. 15 ते नंतर देवदूत परत आकाशम निघी गेल्यावर मेंढपाळ एकमेकासला आखू लागनत "चला आताचं आपून बेथलेमला जाऊ आन देवन जे अद्भूत घटने बद्दल आखीत ता जऊ!” 16 तव्हा ते लगेच निघनत जय योसेफ व मरिया थांबणलत ती जागा त्यासाला सापडनी आन त्यासं जनवारासने गव्हाणम ते बाळाला झोपलेला जोध्या. 17 त्यासं त्याला पाहिल्यावर ते बालकने बद्दल त्यासाला जा आख्याल, ता ते सगळासला आखत गयत. 18 मेंढपाळास जा आख्या ता सगळे लोकसं ऐक्या व ते हे विषयी नवाल करू लागनत. 19 पण मरीयानं हे सगळे गोष्टीसना मनन करी त्या आपले अंतकरणम काळजीपूर्वक ठेवणी. 20 ते नंतर ते परत शेतमं वन्हत जय त्यास्न मेंढर आसनलत. जा त्यास ऐक्याल व जोध्याल ते विषयी ते देवणी स्तुती करतत, सारख ते बद्दल ते चर्चा करतत, कारण देवदूतन त्यासाला सगळाकाही स्पष्ट आखनाल. 21 ते बाळना जन्म झालेनंतर आठवे दिवस, त्यानी सुंता कऱ्या व त्याला येशू हाय नाव देण्यात वन्हा, हाय नाव देवदुतास गर्भधारणा व्ह्वानी आधीच ठेव्याल. 22 पुढ मोशेने नियमनुसार त्याने शुद्धीकरणन दिवस पूर्ण झाल्यावर योसेफ आन मरिया आपले पोऱ्याना देवला समर्पण करवानिसाठी वर येरुश्लेमला गयत. 23 कारण देवने नियमशास्रम आसा लिहलेला आसं "प्रत्येक प्रथम जन्मलेला नर बालक वेगळा ठेवला जावा तो देवनेसाठी पवित्र समजावा. 24 देवना नियम नवीन जन्मलेल्या आई बापला आसा आखं "होल्यास्नी जोडी किवा दोन कबुतर बलिदान म्हणी आर्पण करवा. ” 25 ते वेळेस येरुश्लेमम शिमोन नावना ऐक वृद्ध माणूस आसनाल. तो नेहमी देवला संतुष्टवता आन देवन्या आज्ञा पाळता. तो वाट जोता देवने येवानी आन इस्रायल लोकास्ने उतेजननी व देवने मार्गदर्शननी कारण त्याजवर पवित्र आत्मा आसनाल. 26 आन पवित्र आत्मान त्याला आखनाल का जोपर्यंत तू देवला जोस नाहा तव्हर तुला मरण येणार नाहा. 27 जव्हा मरिया आन योसेफ यासं बाळ येशूला मंदिरम देवनेने नियम प्रमाण आन्ह्या तव्हा आत्मानं शिमोनला आखणा, 28 त्यानं येशूत्याव जुई आखणा देवा स्तुती हो 29 आता देवा तुन्हे वचनने प्रमाणन मराण वन्हा तरी चालही. 30 आन मयं जोयना कि कोणा एकाला तुन्ह मनुष्याने पापनेसाठी आन तारणने साठी पाठवणा. 31 ज्याला तुन्ह सगळे लोकासमहित निवडी लिन्हा आसं 32 इस्रायल लोकास्ने साठी तो सन्मान, प्रकाश सत्यता याजवार तो परिपूर्ण व्ह्यना आसा तुन्ह त्याला दिन्हा. 33 येशूनं आईवडील खूप आश्चर्यचकित व्ह्यनत जव्हा शिमोन येशूने बद्दल बोलना व आशीर्वाद दिन्हा व आई मरीयाला आखणा 34 लक्ष द्या मय का आख ता हे बाळनेसाठी देवन निर्धारित वेळ कजा ठेवणा कारण कित्येक लोकं देवत्याव वळवा व कित्येक लोकासला सावध करवा व कित्येकास त्याने विरोधम उठवा. 35 व कित्येकासना अंतकरण उघडावा मन्ही ती तलवार तुन्हे अंतकरणला भोसकी जाही. 36 तय पवित्र मंदिरने आंगणम भविष्यवादी हन्ना हि वयोवृद्ध आसनेल अशर कुळमधले पनुवेल हाय तीन्हे वडीलना नाव आसनाल सात वर्ष ती नावऱ्यासत्याव ऱ्हयनी नंतर तिन्हा नावरास मरणा. 37 मग ती विधवा म्हणी चौऱ्याऐंशी वर्ष ऱ्हई नेहमी आपले जीवनम तिन्ह मंदिरम देवना कार्य करवानी आन व दिवस रात्र देवनेसाठी उपवास व प्रार्थना करी जीवन व्यतीत करणी. 38 व येरुश्लेमने मुक्ततेनी वाट जोन्हारे लोकास्नेसाठी तिन्ह देवना आभार माननी. 39 मग योसेफ आन मरिया जा का देवने नियमप्रमाण सगळा काही संपवी गालील मधले नासरेथ गावला ते परत निघनत. 40 ता बाळ वाढवानी लागणा व ज्ञानवार पूर्ण व्हइ बलवान व्ह्यना. व देवनी त्याजवर कृपा आसनेल. 41 दर वर्षी प्रमाणं येशून आईवडील सण साजरा करवानी येरुश्लेमला येत आसत. 42 जव्हा येशू बारा वर्षांना व्ह्यना तव्हा ते तय साल प्रमाण वन्ह्त. 43 व जव्हा सणन दिवस पूर्ण संपणत ते नंतर त्यान आईवडील गावी परत निघनत तव्हा येशू हाय येरुश्लेमम विसरणा हाय त्याने आईवडीलासने लक्षांम वन्हा नाहा, व तो येरुश्लेममच ऱ्हयना 44 त्यासला आसा वाटणा की जे दुसर लोकं प्रवास करत ऱ्हइत तो त्यास्ने संग आसं व पूर्ण दिवस प्रवास केल्यावर त्यास त्याला शोधवानी नातेवाईकासत्याव आन मित्रासत्याव चौकशी कऱ्या. 45 जव्हा तो त्यासाला सापडणा नाहा तव्हा ते त्याला शोधवानी परत येरुश्लेमला वन्ह्त. 46 मग तो मंदिरम तीन दिवस नंतर त्यासाला यहुदीधर्मीय शिक्षक गणमं बसलेला दिसणा व तो त्यास्ने बरोबर प्रश्न विचारतानी व त्यास्ना ऐकतानी दिसणा. 47 तव्हा जेवढ लोकं त्याला ऐकतत ते सगळ आश्चर्यचकित व्हई हाय एवढा कसा समजदार आसं हाय जोही ते सगळ लोकं थक्क व्हयनत. 48 जव्हा आईवडिलास त्याला जोध्या ते आश्चर्य चकित व्हयनत त्यान्ही आईन त्याला आखणी मान्हे मुला तू आसा कजा वागनास कारण आम्हू तुला खूप शोध्या. 49 त्यान त्यासाला आखणा "कशानेसाठी तुम्हू मान्हा करत ऱ्हयनलत जा मान्हे बापना आसं ऱ्हऊ नको का त्याजम हाय तुम्ह्ने ध्यानम वन्हा नाहा का 50 पण ते समजू शकनत नाहा तो का आखं.