अध्याय १

प्रस्त्वाना 1 जे गोष्टीसंबधाने आपल्याम पूर्ण खातरी व्ह्यनी आसं, ती गोष्ट सुरवातीपहित प्रत्येक्ष जोन्हारं लोकं व वचनन सेवक 2 यासं आम्हाला आखी ठेवलेला वृतांत लिही काढवाणी काम पुष्कळास हातमं लीध्या आसं; 3 ह्यास्तव, थियफील महाराज, मला पण वाटना कि, सगळे गोष्टीसना मूळपहिन शोध केल्यामुळं मय त्या अनुक्रमे लिही काढाव्या; 4 हेसाठी कि, जे वचनना शिक्षण आपल्याला दिध्या आस त्यास्ना निश्चितपना आपले लाक्षाम यावा. 5 यहुद्यास्ना राजा हेरोद याने दिवसमं आबियाने वर्गामधला जखऱ्या नावना कोन्ही एक याजक आसनाल; त्यानी बायको अहरोनने कुळमधली आशी तिन्हा नाव अलीशिबा आसनाल. 6 ती उभयंता देवने दृष्टिन नीतिमान आसनेल आन प्रभूने सगळ्या आज्ञा आन विधी पाळवानी निर्दोष आसनेल. 7 अलीशिबा वांझ आसल्यामुळं त्यासाला मुलबाळ नसनाल; ती उभयंता वयातीतहि व्ह्यणेल. 8 एकदा आसा व्ह्यना कि, तो आपले वर्गाने आनुक्रमानं देवने पुढ आपला याजकना काम करत आसता, 9 याजकपनने परिपाठप्रमाण प्रभूने पवित्रस्थानम जाई धूप जाळवाणी काम त्यासत्याव वन्हा. 10 धूप जाळवाणी वेळेस लोकास्ना सगळा समुदाय बाहेर प्रार्थना करत ऱ्हयनाल. 11 तव्हा प्रभुना दूत धूपवेदीने उजवे बाजूला उभा ऱ्हयेल त्याला दिसणा. 12 त्याला जोही जखऱ्या अस्वथ आन भयभीत व्ह्यना. 13 देवदूतन त्याला आखणा, जखऱ्या, भिऊ नको, कारण तुन्ही विनंती ऐकवाणी वन्ही आसं. तुन्ही बायको अलीशिबा पहिन तुला मुलगा व्हई आन तू त्याना नाव योहान आसा ठेव. 14 त्याने जन्मान तुला आनंद व्हई व उल्लास वाटही आन पुष्कळ लोकं हर्ष करहित. 15 कारण तो प्रभूने दृष्टिन महान व्हई. तो 'द्राक्षरस आन मद्य कदीच पेणार नाहा, ' आन आपले माताने उदरपहिनच तो पवित्र आत्मान परिपूर्ण आसहि. 16 तो इस्रायलने सनताणमधले पुष्कळासला त्यास्ना देव प्रभू यासत्याव वळव्ही. 17 'बापना अंतकरण मुलासत्याव, ' व आज्ञाभंग लोकासला नीतिमान जनास्ने ज्ञानत्याव वळाडी प्रभूने साठी सिद्ध प्रजा तयार करवा म्हणी तो एलीयाने आत्मान व सामर्थ्यान त्याने पुढ चालही. 18 तव्हा जखऱ्यान देवदूतला आखणा, हाय 'मय कशावरी समजू? ' कारण मय म्हातारा आसं व मान्ही बायकोपण वयातीत आसं. 19 देवदूतन त्याला उत्तर दिन्हा, मय देवने पुढ उभा ऱ्हयणारा गब्रिएल आसं; आन तुन्हे संग बोलावणी आन हाय सुवार्ता तुला आख्वानी मला पाठवीत. 20 तव्हा, हाय घडी ते दिवसपर्यंत तू मुका व्हइस, तुला बोलता येणार नाहा; कारण यथाकाली पूर्ण व्हई आशे मान्हे वचनवर तुन्ह विश्वास ठेवणा नाहा. 21 इकड लोकं जखऱ्यानी वाट जोत ऱ्हयनलत व त्याला पवित्रस्थानम उशीर लागलेमुळ त्यासाला आश्चर्य वाटणा. 22 तो बाहेर आल्यावर त्याला त्यास्ने बरोबर बोलता येहीना; तव्हा त्याला पवित्रस्थानम दर्शन व्ह्यना आसं हाय त्यास ओळ्ख्या. तो त्यासाला खुणा करता. तो तसाच मुका ऱ्हयना. 23 मग त्याने सेवानं दिवस पूर्ण झाल्यावर तो आपले घर गया. 24 ते दिवसनेनंतर त्यानी बायको अलीशिबा गरोदर ऱ्हयनी आन पाच महीनं एकांतम ऱ्हयनी; 25 ती आखती कि, लोकास्म व्ह्नारा मान्हा अनादर दूर करावणीसाठी प्रभून माजत्याव जोयन्हा तव्हा त्यान मान्हे साठी आसा करणा. 26 नंतर सहावे महीनामं देवन गालील मधले नासरेथ नावने गावमं ऐके कुमारीत्याव गब्रीएल देवदूतला पाठवणा. 27 ती दाविद्ने घरमधले योसेफ नावने पुरुषला वाग्दत आसनेल; आन ते कुमारीना नाव मरिया आसनाल. 28 देवदूतन तीसत्याव मधी यीही आखणा, हे कृपा पावलेले स्रीये, कल्याण आसो; प्रभू तुन्हे बरोबर आसो. 29 हे बोलणावहार तीन्हे मनमं खळबळ उडनी आन हाय अभिवादन का आशी यान्हा ती विचार करू लागणी. 30 देवदूतन तिला आखना, मरीये, भिऊ नको, कारण देवणी कृपा तुझवर व्ह्यनी आसं; 31 पाहा, तू गरोदर रहीस व तुला पुत्र व्हई. त्याना नाव येशू ठेव. 32 तो महान व्हई आन त्याला सर्व समर्थ देवना पुत्र आखीत. देव त्याला त्याने लोकासवर राजा म्हणी नेमी त्याना पूर्वज दावीदने सारखा. 33 याकोबने घराणावर तो राज्य करही. त्यांना राज्य कायमना आसही. 34 तव्हा मरीयानं देवदूतला आखणी, ”हाय कसा व्हई, आजून मय कुमारी आसं? 35 देवदुतनं उत्तर दिन्हा, ”पवित्र आत्मा तुजवर यीहीआन देवना सामर्थ तुजवर छाया करही. जा बाळ जन्मही ता पवित्र आसहि आन त्याला देवना पुत्र आखीत. 36 आन हाय जो तुन्ही नातलग अलीशिबा जरी ती म्हातारी आसं तरी तिला पुत्र गर्भ रइत, जरी लोकं तिला वांझ आखत, ती आता सहा महिनानि गरोदर आसं. 37 कारण देव काहीही करू शक!” 38 तव्हा मरीयान आखणी, “खरोखर मे प्रभूनी दासी आसं, तुन्ह मान्हे विषयी जा आखीत तसा व्हउदे !”तव्हा देवदूत तिला सोडी गया. 39 त्याने नंतर लगेच, मरिया तयार व्हई यहुदाने डोंगराळ प्रदेशम गई, जय जखऱ्या रहता. 40 ती त्याने घर गई आन त्यानी बायको अलीशिबा हिला अभिवादन करनी. 41 जसा अलीशिबान मरियाना अभिवादन ऐकनी आन तसाच अलीशिबाने गर्भमधले बाळनं उडी मारना. लगेच अलीशिबा पवित्र आत्मान भरी देवनि स्तुति करू लागणी. 42 तीन मरीयाला मोठ्यान आखणी, “देवन तुला इतर स्रियासपेक्षा अधिक आशीर्वाद दी. त्यान तुन्हा बाळ अधिक आशीर्वादित करना आसं. 43 हाय किती सुंदर आसं कि तू, मान्हे प्रभूनी आई मजत्याव येवानी पाहिजे! 44 तुन्ह अभिवादन कारनी जसा मय ऐकनी, मान्हे गर्भमधले बाळन उडी मारना कारण तो खूप आनंदी आसनाल जव्हा तू वन्हेल. 45 तू आशीर्वादित आसस कारण तुला देवन जा आखणा त्याजवर तुन्ह विश्वास ठेवणीस ता खरा व्हई. 46 तव्हा मरिया देवणी स्तुति करत आखणी : “कशी मे देवनी स्तुती करू ! 47 मे देवने विषयी खूप आनंदित आसं जो मला तारतो. 48 मे फक्त त्यानी प्रिय दासी आसनेल, तरी तो मला विसरणा नाहा. ह्यानेमूळ लोकं मला हे वेळपहिन देवन आशीर्वादित करना आसं आसा आखीत. 49 ते हाय आखीत कारण जे देवन मान्हेसाठी महान गोष्टी करना आसं तो पवित्र आसं ! 50 जो किन्ही त्यान्हा आदर करत त्याने तो पुढचे पिढ्यानपिढ्यासवर कृपा करं. 51 तो हाय दाखवं कि तो किती सामर्थ्याशाली आसं. तो जे अंतकरणान गर्विष्ठ असत त्यास्नी दाणादाण करं. 52 त्यान राजासला राज्य करवानिपहिन थांबवणा आसं, आन जे दडपनने खाली आसत तो त्यासाला मान देय. 53 त्यान जे भुकेले असत त्यासाला उत्तम गोष्टी खावनी दिन्हा आसं. आन त्यान जे श्रीमंत असत त्यासाला काहीही न देता काढी लिन्हा आसं. 54 त्यान इस्रायलला सहाय्य करना आसं, जे लोक त्यान्ही सेवा करत. त्यान आम्हने पूर्वजासला खूप वर्षापूर्वी अभिवचन दिन्हा. कि तो त्यासावर दया करी. 55 त्यान ता अभिवचन पूर्ण करना आन आब्राहाम व जे त्यान सर्व पूर्वज यासावर नेहमी दयेने कृपा करं. 56 मरिया आलीशिबाने संग तीन महिना ऱ्हयनी. बाप्तिस्मा करणारे योहानना जन्म 57 जव्हा अलीशिबानं दिवस भरणत, तव्हा तिला मुलगा व्ह्यना, 58 तिन्ह शेजारी आन नातेवाईक हाय ऐकी प्रभून तिजवर मोठी द्या करना, म्हणी ते अलीशिबा बरोबर आंनद करू लागनत. 59 आठ दिवसने नंतर बाळाने सुंताने विधी करता एकत्र वन्ह्त. त्याने बापना नाव जखऱ्या आसा आसनाल. त्यासाला वाटणा असाच नाव बाळाला दयावणी पाहिजे. 60 पण त्याने आईन आसा आखणी, नाहा, त्यान्हा नाव योहान आसा ठेवानी आसं! 61 त्यासं तिला आख्या, 'पण योहान हाय नाव तुन्हे नातेवाईकासमं कोननाच नाहा! 62 मग ते त्यास्ने हातासं खुणवी त्याने बापला विचाऱ्या, खरा जोध्या तर त्याने पुत्रला का नाव द्यावा. 63 त्यान त्यासाला खुणवी तिजवर लीहावणी पाटी मागवणा. तव्हा त्यास ती दिद्या, त्यान तिजवर लिहणा, ”त्याना नाव योहान. 'तय जा कोणी आस्नल्त ते सगळ आश्चर्यचकित व्हयनत! 64 ताबडतोब जखऱ्या परत बोलू लागणा, आन सुरवातीपहिन देव नि स्तुती करू लागणा. 65 जा कोणी प्रत्येकजण त्याने जवळ आसनाल त्यास जा काही घडणा ता सगळा यहुद्यास्ने डोंगराळ प्रदेशम जाई हि बातमी पसरव्या. 66 ज्यास कोण्ह हाय ऐक्या. ते आखू लागनत, जव्हा हाय बाळ वाढी तव्हा ता का कऱ्ही ह्याने विषयी ते थक्क व्हायनत! कारण त्यासाला हाय माहित आसनाल कि त्याला त्याने सामर्थी मार्गामं त्याला मदत कऱ्ही. 67 नंतर जखऱ्याने पोऱ्याना जन्म व्हयना, जखऱ्या पवित्र आत्मान व्हई देवने विषयी हाय शब्द बोलू लागणा; 68 'प्रभूनी स्तुती आसो, जे देवणी आम्हू इस्रायली लोक स्तुती करत, त्यान इही स्थापित करी त्याने लोकासला, मोकळा करणा. 69 त्याने सामर्थ्यान कोणाऐकाला पाठवी आम्हाला वाचवणा, आसा कोणीऐक सेवक, दाविद्ने कुळमधला आसनाल. 70 खूप वर्षापूर्वी देवन त्याने निवडलेले संदेष्टाने द्वारे हाय आखनाल. 71 हे सामर्थ्यशाली तारणाऱ्याने आम्हाला आम्हने शत्रूपहिन वाचवणा. आन त्यान त्याने सामर्थ्यान जे त्याना द्वेष करत त्यासाला पण वाचवणा. 72 त्यान हाय आशेसाठी करणा कारणा त्याने पवित्र कराराने आपले पूर्वजासवर दया व क्षमा करवा, 73 आशेसाठी आपला पूर्वज आब्रहाम ह्याने बरोबर जी शप्पत वाय्ह्ना ता वचन करवा. ७४ 74 ता आसा कि देवने सामर्थ्यद्वारा आम्ह्ने शत्रू पहिन सोडवा आन आम्हाला पात्र बनव कि आम्हू तुन्ही सेवा न भिता करावा. 75 पवित्रतेने आन धार्मिकतेनं आम्हू आम्ह्ना जीवन जगवा. 76 ते नंतर जखऱ्यान आपले लहान पोऱ्याला आखना मुला तुला सर्व समर्थ देवना संदेष्टा आखीत. तू देवने पुढ जाई त्यान्हा मार्ग लोकास्नेसाठी तयार करहीस. 77 तू लोकासला आखीस देव तुम्हाला क्षमा करं आन त्यास्ने पापनेबद्दल शिक्षा न करता तारण देय. 78 देव आम्हाला क्षमा करही कारण तो दयाळू व कनवाळू आसं. आन ते कारणनेमूळं तारणारा हाय उगवते सूर्यसारखा आकाशमहित आम्ह्नेसाठी यीहि. 79 आन आध्यात्मिक अंधकार आन मृत्यूना भय यासपहित दूर करहि तो आम्हाला मार्गदर्शन करहि ज्याने द्वारे आम्हू शांतीन जगू. 80 जखऱ्या आन अलीशिबा यासना लहान बाळ आत्मामं बलवान व्हत गया इस्रायलम प्रगट व्ह्वानी दिवसपर्यंत अरण्यांम ऱ्हयना.