Ruth 2
Ruth 2:1
बवाज आणि नामीच्या मृत पतीमध्ये काय संबंध होता?
बवाज नामीच्या नवऱ्याचा नातेवाईक होता.
Ruth 2:2
रूथ पहिल्यांदा सरवा वेचायला बाहेर जात असताना, सरवा वेचत असताना कोणा मागे ती जाईल असे रुथ म्हणाली?
ज्याची तिच्यावर कृपादृष्टी होईल त्या कोणाच्यातरी मागे ती जाईल
Ruth 2:4
बवाजाने आपल्या कामगारांना काय अभिवादन केले?
तो म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.”
Ruth 2:5
बवाजाला रूथबद्दल काय जाणून घ्यायचे होते?
ती कोणाची आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते.
Ruth 2:8
बवाजाने रूथेला तिच्या सरवा वेचण्याविषयी कोणत्या सूचना दिल्या?
त्याने रूथला आपले शेत सोडू नये, तर राहून आपल्या महिला कामगारांसह शेतात काम करण्यास सांगितले.
Ruth 2:10
कृपायुक्त सुचणा मिळाल्यानंतर, रूथने बवाजाला कोणता प्रश्न विचारला?
तिने बवाजाला विचारले की आपण माझ्यावर कृपादृष्टी का केली ?
Ruth 2:11
कृपायुक्त सुचणा मिळाल्यानंतर, रूथने बवाजाला कोणता प्रश्न विचारला?
तिने बवाजाला विचारले की आपण माझ्यावर कृपादृष्टी का केली ?
Ruth 2:12
कोणाच्या पंखाखाली रुथेला आश्रय मिळाला आहे असे बवाज म्हणाला ?
रुथला परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय मिळाला.
Ruth 2:15
जेवणानंतर कामावर परतल्यावर बवाजाने रूथवर आणखी कोणती कृपादृष्टी केली?
त्याने रुथेला पेंढ्यांमध्ये सरवा वेचण्याची परवानगी दिली
Ruth 2:16
जेवणानंतर कामावर परतल्यावर बवाजाने रूथवर आणखी कोणती कृपादृष्टी केली?
त्याने रुथेला पेंढ्यांमध्ये सरवा वेचण्याची परवानगी दिली
Ruth 2:19
जेव्हा नामीने रूथने आणलेल्या मोठ्या प्रमाणातील धान्य पाहून तिने रूथला कोणता प्रश्न विचारला?
तिने विचारले की, त्या दिवशी रूथने कोठे सरवा वेचला.
Ruth 2:20
जेव्हा नामीने ऐकले की बवाजाने रूथला मदत केली तेव्हा तीने बवाजाला कोणता आशीर्वाद दिला?
ती म्हणाली, “परमेश्वर त्याचे कल्याण कर ”
Ruth 2:22
बवाजाच्या महिला कामगारांसोबत काम करणे रूथसाठी चांगले आहे असे नामीला का वाटले?
असे केल्याने, रूथला इतर कोणत्याही शेतात त्रास होणार नाही.
Ruth 2:23
बाकीच्या सातूच्या कापणीसाठी रूथने काय केले?
तिने बवाजाच्या कामगारांसोबत सरवा वेचला आणि ती नामीबरोबर राहिली.