Ruth 4
Ruth 4:1
रूथचे आप्तकर्तव्य करणारा कोण असेल या समस्येचे निराकरण करण्यासाठी बवाज कुठे गेला होता?
तो शहराच्या वेशीजवळ गेला.
Ruth 4:2
बवाजाने कोणाला साक्षीदार म्हणून बसण्यास सांगितले?
त्याने शहरातील वडीलधाऱ्यांपैकी दहा पुरुषांना म्हणाला.
Ruth 4:3
बवाज दुसर्या आप्ताबद्दल प्रथम काय बोलला?
त्याने त्याला सांगितले की नामी अलीमलेखाच्या शेताचा वतनभाग विकत आहे.
Ruth 4:4
शेताच्या वतनभागाबद्दल बवाजाने दुसर्या आप्ताला काय सुचवले?
बवाजाने सुचवले की दुसरा आप्त त्यास सोडवू शकेल.
दुसर्या आप्ताचे उत्तर काय होते?
तो म्हणाला की तो सोडविल.
Ruth 4:5
त्यानंतर बवाजाने दुसर्या आप्ताला कोणती अतिरिक्त आवश्यकता सांगितली?
त्याच्या वतनात अलिमलेखाचे नाव कायम राहावे म्हणून त्याने रूथबरोबर लग्न करावे असेही त्याने त्याला सांगितले.
Ruth 4:6
जेव्हा त्याला समजले की त्याला रुथबरोबर लग्न करावे लागेल तेव्हा दुसऱ्या आप्ताचे काय उत्तर होते?
तो म्हणाला तो जमीन सोडवू शकत नाही.
दुसर्या आप्ताने असे का सांगितले की तो आत्पकर्तव्य करणारा होऊ शकत नाही?
तो म्हणाला की यामुळे त्याच्या वतनाचा बिघाड होईल.
जेव्हा त्याला समजले की त्याला रुथबरोबर लग्न करावे लागेल तेव्हा दुसऱ्या आप्ताचे काय उत्तर होते?
Ruth 4:8
बवाज आप्तकर्तव्य करणारा असावा हे दाखविण्यासाठी दुसऱ्या आप्ताने काय केले?
त्याने त्याचे पायतन काढले.
Ruth 4:9
वडिलांनी साक्ष दिली म्हणून बवाजाने केलेला पहिला करार कोणता होता?
अलिमलेखाची सर्व जमीन बवाजाने विकत घेतल्याची त्यांनी साक्ष दिली होती.
Ruth 4:10
वडिलांच्या साक्षीने बवाजाने केलेला दुसरा करार कोणता होता?
त्यांनी साक्ष दिली होती की बवाजाने रूथला आपली बायको म्हणून मिळवून घेतले होते.
Ruth 4:12
लोकांना बवाजासाठी कोणते आशीर्वाद दिले?
तामारेने यहूदाला पुत्र दिला त्याप्रमाणे, रूथपासून परमेश्वराने त्याला संतती द्यावी अशी त्यांची इच्छा होती.
Ruth 4:15
नामीसाठी रुथ सात पुत्रांहुन अधिक आहे असे स्त्रिया का म्हणाल्या?
रूथचे नामीवर असलेल्या प्रेमामुळे, आणि रूथने नामीसाठी नातवाला जन्म दिल्यामुळे त्या असे बोलल्या.
Ruth 4:16
रूथच्या मुलाबरोबर नामीचे काय संबंध होते?
नामी त्याची दाई किंवा काळजीवाहक बनली.
Ruth 4:17
रूथच्या मुलाचे नाव काय होते?
त्याचे नाव ओबेद होते.
ओबेद कोणाचा पिता व आजोबा होता?
ओबेद इशायाचा पिता आणि दावीद याचा आजोबा होता.