Ruth 1

Ruth 1:1

यहुदी इतिहासातील कोणत्या काळात रूथची कहाणी घडली?

जेव्हा शास्ते राज्य असे तेव्हा ती घडली.

अलीमलेख आपल्या कुटुंबासमवेत मवाबला का गेला?

यहूदातील प्रदेशात दुष्काळ पडल्यामुळे तो तेथून गेला

Ruth 1:3

मवाबामध्ये अलीमलेखास काय झाले?

नामीला विधवा करून, तो मरण पावला

Ruth 1:5

मवाबामध्ये नामीच्या मुलांना काय झाले?

नामीजवळ दोन सूना सोडून ते मरण पावले.

Ruth 1:6

नामीने यहुदात परत जाण्याचा निर्णय का घेतला?

यहूदाच्या लोकांना परमेश्वराने अन्न दिले आहे हे तिने ऐकले.

Ruth 1:8

आपल्या दोन सूनांनी कोठे जावे अशी नामीची अशी इच्छा होती?

तिची इच्छा होती की त्यांनी आपल्या आईच्या घरी परत जावे

Ruth 1:9

आपल्या दोन्ही सूनांनी काय शोधावे अशी नामीची इच्छा होती?

तिची इच्छा होती की त्यांनी इतर पतींना शोधावे

Ruth 1:13

आपल्यावर संकट येण्याचे कारण कोण आहे असे नामीला वाटत होते?

तीला वाटत होते की परमेश्वर तीच्या विरुध्द आहे

Ruth 1:16

जेव्हा रूथ नामीबरोबर राहिल्यावर, रूथने नामीला कोणते वचन दिले?

ती म्हणाली, “तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथे मी येईल, ज्या ठिकाणी तुम्ही राहसाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, आणि तुमचा देव तो माझा देव. जेथे तुम्ही मराल तेथे मी मरेल, आणि तेथेच मला पुरतील. मृत्युऐवजी तुमचा आणि माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार करो, किंबहुना अधिक करो.

Ruth 1:17

किती काळ ती नामीबरोबर राहणार असे रुथ म्हणाली?

ती म्हणाली की ती नामीबरोबर त्या मरेपर्यंत राहील

Ruth 1:19

कोणत्या नगरात नामी परतली?

ती बेथलेहेमात परतली

Ruth 1:20

कोणत्या नावाने हाक मारावे असे नामीला वाटत होते व का?

“मारा” म्हणा असे ती म्हणाली,(ज्याचा अर्थ आहे क्लेशमय), कारण तीला वाटते की परमेश्वर तिला क्लेश दिला आहे.

Ruth 1:22

नामी आणि रूथ बेथलेहेममध्ये वर्षाच्या कोणत्या वेळेस पोहचले?

तो समय सातूच्या कापणीच्या सुरूवातीचा होता.